दळवट येथे रु ग्णालयास मान्यता
By admin | Published: October 31, 2016 12:57 AM2016-10-31T00:57:24+5:302016-10-31T01:28:30+5:30
दळवट येथे रु ग्णालयास मान्यता
कळवण : तालुक्यातील दळवट परिसरातील आदिवासी, दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासीबांधवांच्या आरोग्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दळवट येथे ग्रामीण रुग्णालयास शासनाने मान्यता दिली आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारत बाांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
दळवट, बापखेडा, जिरवाडे, शेपूपाडा, कुमसाडी, धनोली, भांडणे, शिवभांडणे, वेरुळे, अंबापूर, शिंगाशी, वीरशेत, मागीलदार, चाफापाडा, ततांनी, शृंगारवाडी, दरेगाव, भाकुर्डे, कोसुर्डे, जामले (हा ) आदि भागांतील आरोग्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सध्या दळवट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सेवेत आहे. या भागातील आरोग्य विषयक प्रश्न आणि आरोग्य विभागाकडून दिली जाणारी सेवाबाबत या भागात गैरसोय होती. आरोग्य सेवा संचालनालयाने दळवट येथील ग्रामीण रु ग्णालयास व मुख्य इमारत बाधकामाच्या १३ कोटी ४६ लाख ५ हजार २०० रुपयांच्या रकमेच्या ंअंदाजपत्रक व नवीन प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. दळवट येथील ग्रामीण रु ग्णालयाच्या मुख्य इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक सन २०१३ -१४च्या दरसूचीवर आधारित आहे. अंदाजपत्रकातील ५ टक्के पाणीपुरवठा व मलनिस्सारण, ५ टक्के अंतर्गत जलविद्युतीकरण, ६ टक्के बाह्य जलविद्युतीकरण, ४ टक्के आकस्मित खर्च याप्रमाणे तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १२ कोटी ६९ लक्ष ५४ हजार एवढ्या रकमेच्या अदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
प्रत्यक्ष काम करतेवेळी पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी, जागेची उपलब्धता, योग्यताबाबत आरोग्य विभागाने पाठपुरावा करावा, अशा अटी व शर्ती शासनाने प्रशासकीय मान्यता देताना लागू केल्या असून निर्णयात नमूद केल्या आहेत. इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या रकमेची अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा, संचालक यांनी शासनास सादर करावे, असे शासनाने निर्णयात नमूद केले आहे . (वार्ताहर)