पिंप्रीसदो झ्र गोंदेदरम्यानच्या सहापदरी महामार्गास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 09:44 PM2020-11-21T21:44:11+5:302020-11-22T01:49:01+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो शिवारातील समृद्धी महामार्ग ते गोंदेदरम्यानच्या चार पदरी महामार्गाचे रुंदीकरण करून महामार्ग सहा पदरी करण्याच्या कामाला शनिवारी (दी.२१) सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने (नॅशनल ॲथॉरिटी ऑफ इंडिया) विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे समृद्धी महामार्ग ते गोंदे यादरम्यान वाहतुकीची होणारी कोंडी निकालात निघणार आहे तसेच नाशिक-मुंबई प्रवासाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.

Recognition of Sahapadari Highway between Pimpri-Chinchwad | पिंप्रीसदो झ्र गोंदेदरम्यानच्या सहापदरी महामार्गास मान्यता

पिंप्रीसदो झ्र गोंदेदरम्यानच्या सहापदरी महामार्गास मान्यता

Next
ठळक मुद्देघोटी : नाशिकझ्र मुबंई प्रवासाचा कालावधी होणार कमी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो शिवारातील समृद्धी महामार्ग ते गोंदेदरम्यानच्या चार पदरी महामार्गाचे रुंदीकरण करून महामार्ग सहा पदरी करण्याच्या कामाला शनिवारी (दी.२१) सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने (नॅशनल ॲथॉरिटी ऑफ इंडिया) विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे समृद्धी महामार्ग ते गोंदे यादरम्यान वाहतुकीची होणारी कोंडी निकालात निघणार आहे तसेच नाशिक-मुंबई प्रवासाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.

पिंप्रीसदो शिवारातून समृद्धी महामार्ग जात आहे. सध्या पिंप्रीसदो ते गोंदेदरम्यान चार पदरी महामार्ग आहे. मुंबईहून ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे साहजिकच वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असल्याने प्रवाशांना इच्छुक स्थळी पोहोचण्यासाठी विलंब होत आहे. यातूनच प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे. याची दखल घेत पिंप्री सदो ते गोंदे या दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरण व्हावे, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते.
अखेर केंद्राच्या परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने पिंप्रीसदो ते गोंदेदरम्यानचा महामार्गाच्या सहा पदरीकरणास मान्यता दिली आहे. याबाबतचे पत्र परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाचे मुख्य जनरल मॅनेजर आशिष असाटी यांनी खासदार हेमंत गोडसे यांना दिले आहे. वडपे ते गोंदेदरम्यान सुमारे ९० किलोमीटरचा महामार्ग असून, त्यापैकी पिंप्रीसदो ते गोंदे हा २० वीस किलोमीटरचा चारपदरी महामार्ग लवकरच सहापदरी होणार आहे.

याकामी सुमारे दोनशे ते अडीचशे कोटी रुपये खर्च येणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिंप्रीसदो ते गोंदे यादरम्यान सहापदरी महामार्गामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात निघणार असून, नाशिकझ्र मुंबई प्रवासाचा कालावधी निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Recognition of Sahapadari Highway between Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.