विद्यापीठ अनुदान आयोगाची संदीप विद्यापीठास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 04:50 PM2018-10-27T16:50:48+5:302018-10-27T16:54:25+5:30
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीच्या- निरीक्षणे / सूचनांच्या संदर्भात संदीप विद्यापीठाने सादर केलेल्या अहवालाचा स्वीकार करीत विद्यापीठ अनुदान आयोगाने महाराष्ट्रात सर्वप्रथम संदीप विद्यापीठास मान्यताप्राप्त राज्य खाजगी विद्यापीठ म्हणून घोषित केल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू कुलगुरू प्रा. एन. रामचंद्रन यांनी विद्यापीठात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.
नाशिक : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीच्या- निरीक्षणे / सूचनांच्या संदर्भात संदीप विद्यापीठाने सादर केलेल्या अहवालाचा स्वीकार करीत विद्यापीठ अनुदान आयोगाने महाराष्ट्रात सर्वप्रथम संदीप विद्यापीठास मान्यताप्राप्त राज्य खाजगी विद्यापीठ म्हणून घोषित केल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू कुलगुरू प्रा. एन. रामचंद्रन यांनी शनिवारी (दि.२७) विद्यापीठात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.
नवी दिल्लीतील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीने विविध विद्याशाखा, पायाभूत सुविधा, आर्थिक क्षमता व व्यवहार्यता, शिक्षण, संशोधन आणि परीक्षांचे मानक निश्चित करण्यासाठी संदीप विद्यापीठास भेट देऊन केले पाहणी व पडताळणीनंतर ही मान्यता देण्यात आली असून आता विद्यापीठाचे नॅक मानांकन प्राप्त करण्याकडे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदिप झा यांच्या कल्पनेतून संदीप विद्यापीठ महाराष्ट्र राज्य खाजगी विद्यापीठ कायद्याअंतर्गत स्थापित करण्यात आले. सुमारे ३०० एकरच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या कॅम्पसमध्ये आजमितीला ३००० हून अधिक विद्यार्थी वेगवेगळ््या विद्याशाखांचे शिक्षण घेत असून त्यांना २०० शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, व्यवस्थापन, कायदा, वाणिज्य, व्यवस्थापन आणि विज्ञान इत्यादी क्षेत्रात डिप्लोमा पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी साठी उच्च शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचीव डॉ. चेतन चौधरी व शैक्षणिक अधिष्ठाता अरुण द्विवेदी दिवेदी उपस्थित होते.
आठ महाविद्यालातून अध्यापन
संदीप विद्यापीठात आठ विविध विद्यालयांतून पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा अभ्यासक्रमांचे अद्यापन सुरू आहे. यात नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम, पसंती आधारित क्रेडिट सिस्टम, विद्यार्थी केंद्रित आणि रोजगार-केंद्रित शिक्षण यासह विविध शाखांमध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, कायदा, वाणिज्य आणि व्यवस्थापन, विज्ञान, औषधशास्त्र विज्ञान, सामाजिक विज्ञान, फॅशन डिझाईन आणि सौंदर्यप्रसाधने विज्ञान आदी शाखांचा समावेश आहे.