नाशिकमधील क्रांतिकारकांच्या घरांना मिळणार ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:35 AM2018-08-03T01:35:52+5:302018-08-03T01:42:05+5:30
नाशिक : ब्रिटिशकाळात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरीत्या चळवळी करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची नाशिकमध्ये मोठी संख्या होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे मेरूमणी आणि प्रेरणास्रोत. काळाच्या ओघात असे क्रांतिकारक विस्मृतीत जाऊ लागले असले तरी ते जेथे राहात होते अशा ठिकाणी त्यांच्या नावांचे फलक लावून किमान त्यांची नावे नव्या पिढीला ज्ञात व्हावी, यासाठी त्यांच्या घरांना ओळख देण्याचा उपक्रम येथील अभिनव भारत मंदिर ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

येत्या ९ आॅगस्टपासून म्हणजे क्रांती दिनाच्या दिवशी त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ज्या वाड्यात भाड्याने वास्तव्यास होते अशा सध्याच्या तिवारी वाड्यापासून हा शुभारंभ करण्यात येणार आहे. ब्रिटिशांच्या विरोधातील लढ्यात नाशिक अग्रेसर होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही भूमी असल्याने त्यांच्या प्रेरणेने अनेक जण या चळवळीत येऊन क्रांतिकारक झाले. काहींची नावे ज्ञात असली तरी अनेकांची नावे विस्मृतीत गेली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेनेच कलेक्टर जॅक्सनचा वध विजयानंद थिएटरमध्ये २१ डिसेंबर १९०९ रोजी करण्यात आला. तिळभांडेश्वर लेनमधील वर्तकांच्या वाड्यात सावरकर भाड्याने राहात होते. हा वाडा तिवारी यांनी घेतला. परंतु त्यात बदल मात्र केले नाहीत. त्याच वाड्यावर असा फलक लावून शुभारंभ करण्यात येईल. अन्य क्रांतिकारकांच्या जन्मदिवशी किंवा पुण्यतिथीच्या दिवशी फलक लावण्यात येणार आहेत. - सूर्यकांत रहाळकर, अभिनव भारत मंदिर ट्रस्ट, नाशिकहुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचे नाव सर्वश्रुत असले तरी त्याचबरोबर कृष्णा गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे हेदेखील प्रामुख्याने सहभागी होते. अशा अनेक क्रांतिकारकांपैकी केवळ सावरकरांची प्रभावळ मानले जातील असे अनेक क्रांतिकारक होते. त्यातील ३३ जणांची माहिती अभिनव भारत मंदिर ट्रस्टकडे उपलब्ध आहे. नव्या पिढीला नाशिकचे क्रांतिकारक कोण होते आणि कोठे वास्तव्यास होते याची माहिती व्हावी यासाठी अशा क्रांतिकारकांच्या मूळ निवासस्थान असलेल्या वाड्यांवर किंवा आता इमारतीत रूपांतरित झालेल्या घरांवर फलक लावण्यात येणार आहे. आता तो वाडा पूर्णत: तिवारी यांच्या मालकीचा आहे.
४अभिनव भारत मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार २७ क्रांतिकारकांच्या मूळ निवासस्थानावर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निवासस्थान’ असा छोटा फलक लावण्यात येणार असून त्यासाठी जागामालकांची संमतीदेखील घेण्यात येणार आहे.