अभोण्यात विद्यार्थिनींनी बांधल्या रोपांना राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 07:57 PM2018-08-27T19:57:46+5:302018-08-27T19:58:08+5:30

अभोणा येथील डांग सेवा मंडळाच्या कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकांनी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात रोपांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

Recognize the girls planted by the girls in Abhaya | अभोण्यात विद्यार्थिनींनी बांधल्या रोपांना राख्या

अभोण्यात विद्यार्थिनींनी बांधल्या रोपांना राख्या

Next

संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी घेत विद्यार्थिनींनी स्वत: लावलेल्या आवारातील रोपांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून अनोखा उपक्र म राबविला. वृक्ष हे खऱ्या अर्थाने सृष्टीचे रक्षक असून वातावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची गरज आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा तोल ढासळत चालला असून संतुलन बिघडत आहे .वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे हा हेतू लक्षात घेऊन या स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरात, घराशेजारी वृक्षारोपणाची चळवळ उभारावी असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. आर. निकम यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्र म अधिकारी प्रा. रवींद्र पगार, प्रा. लता बागुल, प्रा. बी. जी. बोरसे, किसन बागुल यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Web Title: Recognize the girls planted by the girls in Abhaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.