जनसामान्यांप्रती जबाबदारी ओळखून काम करा : सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 04:45 PM2018-03-02T16:45:37+5:302018-03-02T16:45:37+5:30
विरोधकांची भूमिके त आंदोलने, निदर्शने,निवेदने यांच्या माध्यमातून संघर्ष करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाला असून जनसामान्यांप्रती पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिका:यांनी व कार्यकत्र्यानी आपली जाबाबदारी ओळखून जनकल्याणासाठी काम करण्याची गरज असल्याचे सांगत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपच्या नाशिक जिल्हा व शहर मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकत्र्याना कानपिचक्या दिल्या.
नाशिक : आतार्पयत विरोधकांची भूमिके त आंदोलने, निदर्शने,निवेदने यांच्या माध्यमातून संघर्ष करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाला असून जनसामान्यांप्रती पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिका:यांनी व कार्यकत्र्यानी आपली जाबाबदारी ओळखून जनकल्याणासाठी काम करण्याची गरज असल्याचे सांगत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपच्या नाशिक जिल्हा व शहर मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकत्र्याना कानपिचक्या दिल्या.
भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्र्याचा शुक्रवारी (दि.2) मेळावा घेतला. यावेळी ते बोलत होते. त्यांनी कार्यकत्र्याना सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यत पोहोचिविण्याचे आवाहन केले. राष्ट्र व राज्य वैभवशाली होण्यासाठी सर्वानी संघटीत प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करतांना देशमुख यांनी अप्रत्यक्षरीत्या पक्षांर्तगत स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या मतमतांतर दूर करून एकत्रित काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणो आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर लवकरच बुथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त होतील. त्यांनाही प्रशिक्षित करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले. पक्षात कार्यकर्ता पद हेच शेवटर्पयत असते. त्यामुळे कार्यकर्ता म्हणूनच सर्वानी काम करण्याची गरज असून पक्षाशिवाय कोणालाही शून्य किंमत असल्याचे सांगत त्यांनी पदाधिका:यांना सुनावले. यावेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष सुनील बागूल, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महापौर रंजना भानसी, उपमाहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक दिनकर पाटील, विजय साने आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सहकार संस्था उभ्या करा
राज्याच्या राजकारणाचा मूळ आधार सहकारी संस्था असल्याचे भाजपाने हेरले असून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पक्षाच्या मेळाव्यात कार्यकत्र्याना नव्याने सहकारी संस्था उभ्या करण्याचे आवाहन केले. तसेच या सहकार संस्थांच्या मध्यमातून संघटनांही आणखी मजबूत करण्याचा सल्लाही देशमुख यांनी यावेळी पदाधिकारी आणि कार्यकत्र्याना दिला.