सिन्नर नगर परिषदेत २७ पदे भर ण्याची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 10:27 PM2019-12-06T22:27:32+5:302019-12-07T00:32:48+5:30
नऊ वर्षांपूर्वी नगर परिषदेची हद्दवाढ होण्याबरोबरच शहराचा झपाट्याने झालेला विस्तार, नगर परिषदेचा ‘ब’ वर्गात झालेला समावेश झाल्यानंतर कोणतेही पद भरण्यात आले नाही. परिणामी त्याचा नियमित कामकाजावर दुष्परिणाम होऊ लागला आहे. नवीन पद आकृतिबंदात २७ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. ही पदे तत्काळ भरण्याची मागणीही नगराध्यक्ष किरण डगळे यांनी नगर परिषद आयुक्त तथा संचालक मुथ्थुकृष्णन शंकरनारायणन यांच्याकडे केली आहे.
सिन्नर : नऊ वर्षांपूर्वी नगर परिषदेची हद्दवाढ होण्याबरोबरच शहराचा झपाट्याने झालेला विस्तार, नगर परिषदेचा ‘ब’ वर्गात झालेला समावेश झाल्यानंतर कोणतेही पद भरण्यात आले नाही. परिणामी त्याचा नियमित कामकाजावर दुष्परिणाम होऊ लागला आहे. नवीन पद आकृतिबंदात २७ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. ही पदे तत्काळ भरण्याची मागणीही नगराध्यक्ष किरण डगळे यांनी नगर परिषद आयुक्त तथा संचालक मुथ्थुकृष्णन शंकरनारायणन यांच्याकडे केली आहे.
२००९ ला हद्द विस्तार झाल्यानंतर वाढीव क्षेत्राला विविध प्रकारच्या सेवा देण्यास सुरु वात झाली. त्यानंतर २०१६ नगर परिषदेचा ‘ब’ वर्गात समावेश करण्यात आला; मात्र कोणत्याही विभागात पदे भरण्यात आली नाहीत. नगर परिषदेत सध्या उपलब्ध असलेल्या १०० कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढला. त्याचा कामांचा उरक होण्यावर दुष्परिणाम होऊ लागला आहे. वेळेत कामे पूर्ण करण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांना पार पाडावे लागताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अपुºया कर्मचारी संख्येमुळे विविध प्रकारची सेवा देताना व कामकाजावर परिणाम होत असल्याची बाब नगराध्यक्ष डगळे यांनी आयुक्त शंकरनारायणन यांच्याकडे मांडली. सरकारने प्रथम व द्वितीय श्रेणीतील कर्मचारी परिषदेला उपलब्ध करून दिले असले तरी प्रत्यक्षात नागरिकांशी संबंध येणारे तृतीय, चतुर्थ कर्मचाºयांची अपूर्तता कायम आहे. नवीन पद आकृतिबंधात या पदांची २७ इतकी संख्या वाढणार आहे. आकृतिबंधानुसार सर्व पदांची निर्मिती केल्यानंतर पदे भरल्यास कर्मचाºयांवरचा कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.