कॉँग्रेसकडून लोकसभेच्या नावाची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:48 AM2019-01-16T01:48:29+5:302019-01-16T02:01:09+5:30
नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक राष्टÑवादी कॉँग्रेससोबत लढविण्याची तयारी एकीकडे केली जात असतानाच कॉँग्रेसने आपल्याही उमेदवाराची चाचपणी सुरू केली असून, त्यासाठी मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत नाशिक, दिंंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या नावाची शिफारस करण्यात आली.
नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक राष्टÑवादी कॉँग्रेससोबत लढविण्याची तयारी एकीकडे केली जात असतानाच कॉँग्रेसने आपल्याही उमेदवाराची चाचपणी सुरू केली असून, त्यासाठी मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत नाशिक, दिंंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या नावाची शिफारस करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी राज्यातील सर्व जिल्हा कॉँग्रेस कमिट्यांना जिल्हा निवड मंडळाची बैठक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा या तीन जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी जिल्हा निवड मंडळाची बैठक जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (पाटील) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राजाराम पानगव्हाणे, माजी मंत्री शोभाताई बच्छाव व बळवंत गोडसे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी रमेश झामरू कहांडोळे, नयना गावित, काशीनाथ बहिरम यांच्या नावांची शिफारस करण्यात आली. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी नाशिक जिल्ह्णातून एकमेव डॉ. तुषार शेवाळे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. यावेळी माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, अनिल अहेर यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीस आमदार निर्मला गावित, शिरीषकुमार कोतवाल, राजेंद्र मोगल, डॉ. राजेंद्र ठाकरे, निवृत्ती लहरे, जयश्री बर्डे, विनायक सांगळे, समीर देशमुख, ज्ञानेश्वर काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारीवर चर्चाबैठकीत विधान परिषदेचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. शिवाजीराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सर्व तालुकाध्यक्षांशी बूथ कमिट्याचा आढावा घेण्यात आला. तसेच सर्व तालुकाध्यक्ष यांच्याशी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवार व पक्षाची तयारी या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.