सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्य शासनाला शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 11:15 PM2019-11-10T23:15:29+5:302019-11-11T01:17:21+5:30
सफाई कर्मचारी अनेक शासकीय सुविधांपासून वंचित असून, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी सफाई कर्मचारी आयोगामार्फत राज्य शासनाला शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्टÑ राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नाशिक : सफाई कर्मचारी अनेक शासकीय सुविधांपासून वंचित असून, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी सफाई कर्मचारी आयोगामार्फत राज्य शासनाला शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्टÑ राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांना असलेल्या शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळावा, तसेच त्यांच्या घरांची झालेल्या दुरावस्थेत सुधारणा व्हावी तसेच त्यांना वेळेत पगार मिळावा यासाठी सारवान यांनी जिल्हा दौरा करून सफाई कर्मचाºयांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी मालेगाव महानगरपालिका व मालेगाव ग्रामीण जिल्हा रुग्णालयत आढावा बैठक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक यांच्यासोबत व देवळाली कॅन्टोमेंट बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक, नांदगाव नगर परिषद व मनमाड नगर परिषद आढावा बैठक, नाशिक महानगरपालिका सफाई कामगार वसाहत, उपनगर मनपा वसाहत, महात्मा गांधी धाम, नाशिकरोड पाहणी दौरा तसेच इगतपुरी नगर परिषद व शासक ीय ग्रामीण रुग्णालयाचा दौरा करून सफाई कर्मचाºयांचे प्रश्न जाणून घेतले. यासाठी त्यांच्याकडून सफाई कामगारांच्या विकासासाठी त्यांच्या दौºयाचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करणार असल्याचे सारवान यांनी सांगितले. यावेळी विशाल साळवे, रूपेश शिंदे, अमन सारवान, शाहरुख पिंजारी, मिलिंद पवार उपस्थित होते.