५२ वर्षांपूर्वीचा मतांचा विक्रम अबाधितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:06 AM2019-05-01T01:06:29+5:302019-05-01T01:06:47+5:30

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. २९) झालेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली असून नाशिक मतदारसंघात ५९.४० तर दिंडोरीत ६५.६४ टक्के मतदान नोंदविले गेले आहे.

 The record of 52 years ago was unprecedented | ५२ वर्षांपूर्वीचा मतांचा विक्रम अबाधितच

५२ वर्षांपूर्वीचा मतांचा विक्रम अबाधितच

Next

नाशिक : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. २९) झालेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली असून नाशिक मतदारसंघात ५९.४० तर दिंडोरीत ६५.६४ टक्के मतदान नोंदविले गेले आहे.
नाशिक मतदारसंघात तब्बल ५२ वर्षानंतर मतदानाची आकडेवारी ६० टक्क्यांच्या जवळपास जाऊन पोहोचली आहे तर दिंडोरीमध्ये ५७ वर्षानंतर या आधीच्या विक्रमी ६६.७६ टक्के मतदानाच्या आसपास आकडेवारी जाऊन पोहोचली आहे. मतदानाचा हा वाढलेला टक्का प्रामुख्याने नवमतदारांचा असल्याचे सांगितले जात आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यंदा मोठ्या प्रमाणावर जागृती होऊनही दोन्ही मतदारसंघातील विक्रम मात्र अद्याप मोडू शकलेला नाही.
नाशिक लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या १७ लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक ६५.७९ टक्के मतदान १९६७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नोंदविले गेले असून तोच आजवरचा विक्रम आहे. त्यानंतर ५२ वर्षात आजवर कधीही मतदानाच्या टक्केवारीने साठी ओलांडलेली नाही. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ५८.८३ टक्के मतदानाची नोंद झालेली होती. यंदा मात्र मतदानाच्या टक्केवारीत अल्पशी वाढ झाली असून नाशिकमध्ये ५९.४० टक्के मतदान नोंदविले गेले आहे. तब्बल ५२ वर्षानंतर मतदान साठीच्या आसपास जाऊन पोहोचले आहे.
दिंडोरी मतदारसंघातही १९५७ मध्ये झालेल्या पूर्वाश्रमीच्या मालेगाव लोकसभा मतदारसंघात ६६.७६ टक्के मतदान झाले होते. हा आजवरचा विक्रम आहे. तो अद्याप मोडू शकलेला नाही. मागील निवडणुकीत २०१४ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ६३.४१ टक्के मतदान झाले होते. यंदा हा आकडा ६५.६४ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. १९६२ मध्ये ६२.५९ तर १९९९ मध्ये ६४.५० टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा १९५७ मध्ये झालेल्या विक्रमी मतदानाच्या टक्केवारीच्या आसपास जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न झालेला आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण व आदिवासी भागात मतदानाचा मोठा उत्साह दिसून आला. प्रामुख्याने, तरुण नवमतदार आणि महिला मतदार मोठ्या प्रमाणावर घराबाहेर मतदानासाठी पडल्याचे दिसून आले.
मतदानाची टक्केवारी
वर्ष नाशिक मालेगाव
1951 53.17 ---
1957 48.13 63.40
1962 54.18 66.76
1967 65.79 62.59
1971 57.35 55.89
1977 54.70 51.74
1980 53.42 47.27
1984 56.51 55.93
1989 54.84 52.02
1991 50.72 44.42
1996 48.58 41.72
1998 51.65 48.09
1999 57.88 64.50
2004 43.13 48.35
2009 45.42 47.57
2014 58.83 63.41

2019    59.40          65.64

Web Title:  The record of 52 years ago was unprecedented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.