कादवाच्या निवडणुकीत विक्रमी ९३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 12:30 AM2022-04-04T00:30:25+5:302022-04-04T00:30:25+5:30

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी (दि.३) सरासरी ९३ टक्के मतदान झाले असून, पुन्हा कादवा विकास की परिवर्तनला संधी मिळणार, याचा निकाल बंद पेटीत बंदिस्त झाला आहे. रणरणत्या उन्हात वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीतून या निवडणुकीतील चुरस दिसून आली असली तरी वाढती मतदानाची आकडेवारी कुणाला तारक ठरणार हे सोमवारी (दि.४) स्पष्ट होईल.

Record 93% turnout in mud elections | कादवाच्या निवडणुकीत विक्रमी ९३ टक्के मतदान

कादवाच्या निवडणुकीत विक्रमी ९३ टक्के मतदान

Next
ठळक मुद्देआज मतमोजणी : मतदानाची वाढलेली टक्केवारी कुणाला तारणार?

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी (दि.३) सरासरी ९३ टक्के मतदान झाले असून, पुन्हा कादवा विकास की परिवर्तनला संधी मिळणार, याचा निकाल बंद पेटीत बंदिस्त झाला आहे. रणरणत्या उन्हात वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीतून या निवडणुकीतील चुरस दिसून आली असली तरी वाढती मतदानाची आकडेवारी कुणाला तारक ठरणार हे सोमवारी (दि.४) स्पष्ट होईल.

प्रचंड उन्हाच्या तडाख्यातही मताचा टक्का वाढल्याने निकालाकडे लक्ष लागले आहे. असे असले तरी कादवा विकास पॅनल व परिवर्तन पॅनलच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच विजयाचा दावा केला आहे. मतमोजणी सोमवारी दिंडोरी येथील सांस्कृतिक भवन येथे होणार असून, निकालही त्यादिवशीच लागणार आहे. यासाठीची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे. सुमारे बारा हजार मतदार असलेल्या या संस्थेत जवळपास ९३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारांनी आपल्या स्वतःच्या वाहनाने येऊन मतदान केल्याचे चित्र प्रथमच बघावयास मिळाले आहे. दिंडोरी व चांदवड तालुका, असे दोन तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेले व महाराष्ट्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा कादवा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक संपली असून, मतदारांनी आपला निकाल मतपेटीत कुलूपबंद केला आहे.

सकाळपासूनच कादवा विकास पॅनलच्या वतीने पॅनलप्रमुख श्रीराम शेटे यांच्यासोबतच विधानसभा अध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ, बाजार समिती अध्यक्ष दत्तात्रेय पाटील, गणपतराव पाटील आदींसह काही नेते मंडळी प्रचारात सक्रिय होते, तसेच परिवर्तन पॅनलच्या बाजूने माजी अध्यक्ष बाजीराव कावळे, सुरेश डोखळे, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले व तालुक्यातील नेते मंडळी मोठ्या प्रमाणात मतदारांना आवाहन करताना दिसत होते. यावेळी एकूण पाच गटांमध्ये ही निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये कसवे वणी, दिंडोरी, मातेरेवाडी, चांदवड व वडनेर भैरव येथे निवडणूक केंद्र उभारण्यात आले होते.

गटनिहाय मतदानाची आकडेवारी
वणी गट : ४५५९ पैकी ३८१६ ( ९१.७५ टक्के) दिंडोरी गट : २४८७ पैकी २२९३ (९२ टक्के) मातेरेवाडी गट : २५३५ पैकी २३६४ (९३.२५ टक्के), चांदवड गट : १२६७ पैकी ११८९ (९३.८४ टक्के), वडनेर भैरव गट : १६६८ पैकी १५४० (९२ टक्के), असे एकूण १२.११६ पैकी ११.२०२ इतके मतदान झाले असून, मतदानाची सरासरी एकूण टक्केवारी ९३ टक्के इतकी झाली आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी कुणाला तारक आणि कुणाला मारक ठरणार? हे सोमवारी स्पष्ट होणार असून, अवघ्या जिल्ह्याचे लक्ष कादवा कारखान्याच्या निवडणूक निकालाकडे लागले आहे.

फोटो- ०३ श्रीराम शेटे
०३ बाजीराव कावळे

०३ संपत वक्ते
०३ सुरेश डोखळे

 

 

Web Title: Record 93% turnout in mud elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.