अभोण्यात कांद्याची विक्रमी आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 10:56 PM2020-10-02T22:56:08+5:302020-10-03T00:52:03+5:30
अभोणा : कळवण कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात चार दिवसात उन्हाळ कांद्याची अंदाजे 23 हजार क्टिंटल अशी विक्र मी आवक होऊन दर मात्र टिकून होते.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
अभोणा : कळवण कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात चार दिवसात उन्हाळ कांद्याची अंदाजे 23 हजार क्टिंटल अशी विक्र मी आवक होऊन दर मात्र टिकून होते.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गुरु वारी (दि.1)आवारात कांद्याची 314 ट्रॅक्टर इतकी आवक झाली. सुपर कांद्यास 4000 ते 4805 रु पये,सरासरी 3000 ते 3600 रु पये तर खाद कांद्यास 500 ते 1700 रूपये प्रती क्टिंटल दर मिळाला. सोमवारी 515 ट्रॅक्टर आवक होऊन सुपर कांद्यास 4100 ते 4905 रु पये,सरासरी 3200 ते 3700 रु पये तर खाद कांद्यास 300 ते 2000 रु पये असे भाव होते.मंगळवारी 333 ट्रॅक्टर आवक होऊन सुपरकांदा 4100 ते 4805 रु पये, सरासरी 3200 ते 3700 रु पये तर खाद 400 ते 2000 रु पये भाव मिळाला. तर बुधवारी 299 ट्रॅक्टर आवक होऊन सुपर कांदा 4000 ते 4705 रु पये, सरासरी 3100 ते 3500 रु पये तर खाद कांद्यास 400 ते 1700 रु पये भाव मिळाला. एकुणच सप्ताहात उन्हाळ कांद्याच्या भावात किरकोळ चढ-उतार वगळता सध्या तरी भाव टिकून असल्याने चाळीत साठवून ठेवलेला कांदा शेतकरी टप्याटप्याने विक्र ीसाठी आणतांनां दिसत आहेत.