एकाच दिवशी ११ ठिकाणी मध काढण्याचा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:15 AM2018-03-24T00:15:51+5:302018-03-24T00:15:51+5:30
आजच्या युगात रोजगाराची कामे मिळवून पैसा कमवणे अवघड ही झाले आहे. आण िकाम पाहून पैसा कमविणे हा विषय पण गांभीर्याच्या झाला आहे. जेवढे काम अवघड तेवढे कामाचे मोल मजूर घेत असतो. एका हाताने काम तर दुसर्या हाताने लगेच पैसा अशी मजुरांची पध्दत झाली आहे.
मानोरी : आजच्या युगात रोजगाराची कामे मिळवून पैसा कमवणे अवघड ही झाले आहे. आण िकाम पाहून पैसा कमविणे हा विषय पण गांभीर्याच्या झाला आहे. जेवढे काम अवघड तेवढे कामाचे मोल मजूर घेत असतो. एका हाताने काम तर दुसर्या हाताने लगेच पैसा अशी मजुरांची पध्दत झाली आहे. मानोरी बुद्रुक येथील युवक अमोल भवर या युवकाने मागील चार ते पाच वर्षांपासून मोल मजुरी करून आपला कौटुंबिक गाडा चालवत आहे. बागांची कामे, घरी गाईचा व्यवसाय करणे आदी कामे करून तो एक अवघड काम हाती घेत लोकांकडून कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता झाडावर असलेले मधमाश्यांचे मध काढून देन्याचे काम करत आहे. आयुर्वेदिक उपचारासाठी मधाला फार महत्त्व आहे. त्यामुळे गावात कोणालाही मधाची गरज असली तर नागरिक अमोल कडे येऊन आम्हाला मध पाहिजे आहे असे सांगितल्यावर ज्या ठिकाणी दिसेल त्याठिकाणी जाऊन मग ती जागा काटेरी झुडपाची असो की उंच झाडावर तिथं पर्यंत जाऊन केवळ एका घिमल्यात थोडासा धूर करून मधमाश्यांचे पोळ्याजवळ धरले की लगेच ती फांटी तोडून मध एक रु पयाही न घेता देऊन टाकतो. त्यामुळे त्याचा हा विषय गावात कौतूकतेचा ठरत आहे. शनिवार 17 मार्च रोजी अमोल ने एकाच दिवशी तब्बल 11 ठिकाणचे मध काढण्याचा पराक्र म केला आहे.