टमाट्याची विक्रमी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 01:22 AM2020-09-09T01:22:41+5:302020-09-09T01:23:18+5:30

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सायंकाळी जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या टमाट्याची विक्रमी आवक झाली असून, मोठ्या प्रमाणात आवक होऊनही टमाट्याला आठशे ते अकराशे रुपये जाळीचा दर मिळाल्याने टमाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्ह्णातील शेतकºयांनी आपला शेतमाल मोठ्या प्रमाणात बाजार समितीत आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी केले आहे.

Record inflow of tomatoes | टमाट्याची विक्रमी आवक

टमाट्याची विक्रमी आवक

Next

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सायंकाळी जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या टमाट्याची विक्रमी आवक झाली असून, मोठ्या प्रमाणात आवक होऊनही टमाट्याला आठशे ते अकराशे रुपये जाळीचा दर मिळाल्याने टमाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्ह्णातील शेतकºयांनी आपला शेतमाल मोठ्या प्रमाणात बाजार समितीत आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी केले आहे.
जिल्ह्णातील ग्रामीण भागात पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकºयांनी आपला शेतमाल काढण्यास सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून नाशिक बाजार समितीत मंगळवारी सुमारे ४८ हजार टमाटाच्या जाळ्या (क्रेट्स) विक्रीसाठी दाखल झाल्या. सायंकाळी झालेल्या लिलावात टमाट्याला प्रतवारीनुसार ८०० ते ११५० रुपये इतका दर मिळाला. नाशिक बााजर समितीत इतक्या मोठ्या प्रमाणात टमाटा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Web Title: Record inflow of tomatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.