अवयवदान नोंदणीचा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 01:12 AM2019-02-11T01:12:21+5:302019-02-11T01:12:37+5:30
अवयवदानाचे महत्त्व वाढावे आणि आरोग्यासाठी सजगता वाढावी यासाठी स्वराज फाउंडेशनच्या विद्यमाने आयोजित वॉक फॉर हेल्थ उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. शिवाय एकाच वेळी २५०५ नागरिकांनी अवयवदानाचा अर्ज केल्याने यासंदर्भातही अनोखा विक्रम प्रस्थापित झाला आहे. वंडर बुक आॅफ रेकॉर्डच्या मुख्य समन्वयक अमी छेडा यांच्या हस्ते स्वराज फाउंडेशनला विश्वविक्र म केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
नाशिक : अवयवदानाचे महत्त्व वाढावे आणि आरोग्यासाठी सजगता वाढावी यासाठी स्वराज फाउंडेशनच्या विद्यमाने आयोजित वॉक फॉर हेल्थ उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. शिवाय एकाच वेळी २५०५ नागरिकांनी अवयवदानाचा अर्ज केल्याने यासंदर्भातही अनोखा विक्रम प्रस्थापित झाला आहे. वंडर बुक आॅफ रेकॉर्डच्या मुख्य समन्वयक अमी छेडा यांच्या हस्ते स्वराज फाउंडेशनला विश्वविक्र म केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
रविवारी (दि.१०) डॉन बॉस्को जवळून सकाळी या फेरीला प्रारंभ झाला. विशेष म्हणजे ब्लाइंड असोसिएशनच्या अंध मुलांच्या नेतृत्वाखाली वॉक सुरू करण्यात आले. या वॉकमध्ये डीआयडीटी कॉलेज, जीडी सावंत कॉलेज, नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय, सॅव्ही कॉलेज, ब्लाइंड आॅर्गनायझेशन, रोटरी क्लब आॅफ नाशिक ईस्ट, नामको हॉस्पिटल, आकार फाउंडेशन, समिज्ञा फाउंडेशन, दिव्य फाउंडेशन, शिवताल वाद्य पथक आदी संस्थेच्या स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. यात विविध संस्थांनी अवयवदानाची जनजागृती करत विशेष फलक व देखावे सादर करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमामध्ये नूपुर डान्स अकॅडमी तसेच परिचारकांनी अवयवदान जनजागृती करत नाटिका सादर केली.
प्रास्ताविक फाउंडेशनचे संस्थापक आकाश छाजेड यांनी केले. सूत्रसंचालन तन्मय जोगळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदेशदूत रंजिता शर्मा यांनी केले. या कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्यास आमदार देवयानी फरांदे, डॉ. संजय चावला, डॉ. विभूते, नगरसेविका समीना मेमन, आशा तडवी, योगेश हिरे, बीवायके कॉलेजचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्रीतिश छाजेड, डॉ. मनीष पाठक, आयएमएचे अध्यक्ष अवेश पलोड, सिनेअभिनेते अरमान ताहील आदी उपस्थित होते.