नांगराची वण्डर बुकमध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:32 AM2018-11-11T01:32:20+5:302018-11-11T01:32:50+5:30
बलिप्रतिपदेनिमित्त नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रांगणात भव्य ३० फूट उंचीच्या नांगराचे पूजन करण्यात आले. या नांगराची वण्डर बुक आॅफ रेकॉर्ड इंटरनॅशनलमध्ये नोंद झाली आहे. या नांगराची कल्पना प्रत्यक्षात आणणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महानगरप्रमुख नितीन रोठे यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
नाशिक : बलिप्रतिपदेनिमित्त नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रांगणात भव्य ३० फूट उंचीच्या नांगराचे पूजन करण्यात आले. या नांगराची वण्डर बुक आॅफ रेकॉर्ड इंटरनॅशनलमध्ये नोंद झाली आहे. या नांगराची कल्पना प्रत्यक्षात आणणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महानगरप्रमुख नितीन रोठे यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. बळीराजाच्या उपजीविकेचे साधन असलेल्या नांगरासोबत यावेळी विळे, खुरपे, घमेले, टिकाव, फावडे, कुदळ अशा विविध वस्तूंचीही पूजा करण्यात आली. सोबत बळीराजाला नतमस्तक होऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज
वडघुले, प्रदेश प्रवक्ते संदीप जगताप, वण्डर बुक आॅफ रेकार्ड इंटरनॅशनल लंडनच्या अमया छेडा, जिल्हाध्यक्ष नाना बच्छाव, माजी नगराध्यक्ष केशव भोसले, चंद्रकांत बनकर, राजू देसले, सेवा दल काँग्रेसचे वसंत ठाकूर, सुदाम शिंदे, दर्शन बोरस्ते, प्रवीण वडजे, हर्षल पवार, योगेश पोटे, यश बच्छाव, शरद लभडे आदी उपस्थित होते. दरम्यान, कवी संदीप जगताप यांनी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.