बंगळुरू येथे संजीवनीने मोडला कविताचा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:20 AM2018-05-28T01:20:36+5:302018-05-28T01:20:36+5:30
बंगळुरू येथे रविवारी झालेल्या टीसीएस जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने १० किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकतानाच कविता राऊत हिचा विक्रम मोडीत काढून नवी विक्रमही प्रस्थापित केला. तिने ३३:८८ मिनिटांची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळविला.
नाशिक : बंगळुरू येथे रविवारी झालेल्या टीसीएस जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने १० किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकतानाच कविता राऊत हिचा विक्रम मोडीत काढून नवी विक्रमही प्रस्थापित केला. तिने ३३:८८ मिनिटांची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळविला. बंगळुरू येथील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी दबदबा कायम राखला आहे. यापूर्वी कविता राऊत, मोनिका आथरे यांनी या स्पर्धा जिंकल्या असून, आता संजीवनीनेदेखील स्थान मिळविले आहे. सावरपाडा एक्स्प्रेस आणि संजीवनीची मार्गदर्शक असलेल्या कविता राऊत हिने यापूर्वी या स्पर्धेत ३४:३२ मिनिटांची उत्कृष्ट वेळ नोंदविली होती. तिचा हा विक्रम मागे टाकत संजीवनीने रविवारी (दि.२७) रोजी झालेल्या स्पर्धेत ३३:८८ मिनिटांची वेळ नोंदवत कवितालाही मागे टाकले. या स्पर्धेत संजीवनीने सुवर्णपदक पटकाविले, तर स्वाती गाढवे आणि करणजित कौर यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. कॉनवेल्थ स्पर्धेती संधी हुकलेल्या संजीवनीचे आगामी लक्ष्य एशियन क्रॉसकन्ट्री असून त्यादृष्टीने तिची जोरदार तयारी सुरू आहे. बंगळुरू येथील विक्रमी धाव घेत संजीवनीने आपले मनसुबे स्पष्ट केले आहे. या स्पर्धेत दुसऱ्या आणि तिसºया स्थानावर राहिलेल्या धावपटूंपेक्षा संजीवनीचा वेग अधिक होता. त्यांच्यापेक्षा दोन मिनिटे आधी तिने ही स्पर्धा पूर्ण केली. साउथ एशियन स्पर्धा जिंकल्यानंतर कविता बंगळुरूतील स्पर्धेत सहभागी झाली होती.