डाळिंबाला विक्रमी भाव
By admin | Published: August 27, 2016 12:28 AM2016-08-27T00:28:16+5:302016-08-27T00:28:31+5:30
सिन्नर फाटा उपबाजार : २०० रुपये किलो
चाडेगाव : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरफाटा उपबाजार आवार येथे शुक्रवारी डाळिंबाला उच्चांकी २०० रुपये किलोचा भाव मिळाल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सिन्नरफाटा उपबाजार आवारात शुक्रवारी ४५० कॅरेट डाळिंबाची आवक झाली होती. २० किलोच्या डाळिंबाच्या कॅरेटला चार हजार रुपये भाव मिळाल्याने या वर्षातला सर्वात उच्चांकी बाजारभाव असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले. सिन्नरफाटा उपबाजार आवारात गेल्या सहा महिन्यांपासून डाळिंबाच्या लिलावास सुरुवात झाली आहे.
उपबाजार आवारात भाजीपाला, फळ आदिंची जास्त आवक नसल्याने व्यापाऱ्यांची संख्या कमी आहे; मात्र डाळिंबाला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात डाळींब नाशिकरोड उपबाजार समितीत विकण्यास आणतील असे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी उपबाजारात फळे व पालेभाज्या विक्रीस आणाव्यात, असे आवाहन नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने संचालक प्रवीण नागरे, कर्मचारी यू. एल. तुंगार, बाळासाहेब पवळे यांनी केले आहे. (वार्ताहर)