जिल्ह्यात ३६ तासात विक्रमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:32 AM2017-10-12T00:32:50+5:302017-10-12T00:32:50+5:30
नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, गेल्या ३६ तासांत जिल्ह्यात ५३३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. ऐन सणासुदीत पावसाच्या संततधारेमुळे जनजीवनावरही परिणाम झाला असून, शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पावसाने आपली हजेरी कायम ठेवली आहे. बुधवारीही दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती.
नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, गेल्या ३६ तासांत जिल्ह्यात ५३३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. ऐन सणासुदीत पावसाच्या संततधारेमुळे जनजीवनावरही परिणाम झाला असून, शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पावसाने आपली हजेरी कायम ठेवली आहे. बुधवारीही दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. नाशिक शहरातील अनेक भागात सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसाने दुपारी काही वेळ विश्रांती घेतली, मात्र दुपारी चार वाजेनंतर आकाशात काळे ढग दाटून जोरदार पाऊस सुरू झाला सुमारे पाऊण तास कोसळलेल्या पावसाने रस्ते जलमय होऊन अनेक ठिकाणी घरांमध्ये, तळघरांत पाणी साचले. त्यामुळे रस्ता वाहतूक काही प्रमाणात मंदावली होती. दिवसभरात नाशिक शहरात २० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. जिल्ह्णातील ग्रामीण भागात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ४२७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असून, फक्त नांदगाव तालुक्यात पाऊस झाला नाही. सर्वाधिक पावसाची नोंद सुरगाणा व त्यानंतर कळवण तालुक्यात करण्यात आली आहे. बुधवारीही पावसाने ग्रामीण भागाला झोडपून काढले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्णात १०६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, निफाड, सिन्नर, देवळा, नांदगाव, कळवण, सुरगाणा या तालुक्यात पाऊस झाला.
पावसाच्या संततधारेने शेतकरी हवालदिल झाले असून, बाजारात कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने शेतकºयांनी साठवलेला कांदा बाजारात आणण्याची तयारी चालविली असता पावसामुळे कांदा ओला होऊन सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर द्राक्षबागांच्या छाटणीवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. बागांमध्ये पाणी साठू लागल्याने त्यामुळे पालवी फुटण्यास विलंब होण्याचा अंदाज आहे. याशिवाय कापणीवर आलेले सोयाबीन, तूर, भुईमूग, मका व बाजरी पिकानांही फटका बसला आहे. असाच पाऊस आणखी काही दिवस सुरू राहिल्यास परिस्थिती बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यंदा १ जून ते ११ आॅक्टोबरदरम्यान जिल्ह्यात १२५ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. मालेगाव तालुकावगळता चौदा तालुक्यात पावसाने शंभरी ओलांडली असून, नाशिक तालुक्यात १९० टक्के इतका सर्वाधिक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात १०९ टक्के पाऊस नोंदविला गेला होता.