राज्यात शिवभोजन थाळीचा विक्रमी थाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 11:23 PM2020-10-08T23:23:53+5:302020-10-09T01:19:06+5:30

नाशिक: महाविकास आघाडी सरकारच्या शिवभोजन थाळी या महत्वकांक्षी योजनेच्या गेल्या दहा महिन्यांची आकडेवारी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जाहिर केली आहे. त्यानुसार राज्यात शिवभोजन थाळी वाटपाचा विक्रम झाला असून तब्बल दोन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतल्याचा दावा केला आहे.

Record of Shiva food plate in the state | राज्यात शिवभोजन थाळीचा विक्रमी थाट

राज्यात शिवभोजन थाळीचा विक्रमी थाट

Next
ठळक मुद्देअन्नपुरवठा विभाग : दोन कोटी नागरीकांनी आस्वाद घेतल्याचा दावा

नाशिक: महाविकास आघाडी सरकारच्या शिवभोजन थाळी या महत्वकांक्षी योजनेच्या गेल्या दहा महिन्यांची आकडेवारी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जाहिर केली आहे. त्यानुसार राज्यात शिवभोजन थाळी वाटपाचा विक्रम झाला असून तब्बल दोन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतल्याचा दावा केला आहे.

राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी े मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी शिवभोजन झाळी हीी महत्वकांक्षी योजना सुरू केली आहे. भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने शिवभोजन योजना सुरु केल्यानंतर जानेवारी महिन्यात ७९ हजार ९१८, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ६७ हजार, मार्च महिन्यात ५ लाख ७८ हजार नागरिकांनी थाळीचा आस्वाद घेतला. लॉकडाऊन मधील एप्रिल, मे आणि जून या महिन्यात अनुक्रमे २४ लाख ९९ हजार, ३३ लाख ८४ हजार, आणि ३० लाख ९६ हजार इतक्या नागरीकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला.

लॉकडाऊननंतरच्या काळात जुलै महिन्यात ३० लाख ३ हजार , आॅगस्ट महिन्यात ३० लाख ६० हजार , सप्टेंबर महिन्यात ३० लाख ५९ हजार, आणि दिनांक ७ आॅक्टोबर पर्यंत ७ लाख ९ हजार १७६ अशा एकूण १ कोटी ९९ लाख ३७ हजार ४९२ गरीब आणि गरजू नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असून शिवभोजन थाळी वाटपाचा विक्रम झाला असल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे.


१) राज्यातील गोरगरीब नागरिकांना केवळ १० रुपयांत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली.

२) कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला.

३) हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने पाच रुपयात शिवभोजन देण्याचा निर्णयास मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे

 

Web Title: Record of Shiva food plate in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.