नाशिक शहरात पोलिसांची रस्ता अडवून वसुली मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:04 AM2018-11-22T00:04:17+5:302018-11-22T00:16:54+5:30
गेल्या आठवड्यापासून शहरात पोलिसांची वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी धडक मोहीम सुरू आहे. परंतु, ही मोहीम राबविताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांवर कारवाई करीत असताना पोलीस यंत्रणा स्वत:च नियमांकडे काणाडोळा करीत आहे.
नाशिक : गेल्या आठवड्यापासून शहरात पोलिसांची वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी धडक मोहीम सुरू आहे. परंतु, ही मोहीम राबविताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांवर कारवाई करीत असताना पोलीस यंत्रणा स्वत:च नियमांकडे काणाडोळा करीत आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर एबीबी सर्कल येथे मंगळवारी (दि. २०) वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी सिग्नलवरून डावे वळण पूर्णपणे अडवून रिक्षाचालकांवर तपासणी मोहीम राबविली. पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेमुळे ठक्कर डोम आणि सिटी सेंटर मॉलकडे जाणारा रस्ता पोलिसांमुळे अडवला गेल्याने वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. अनेकांना काही क्षण थांबून पोलिसांना विनंती करून
पुढे जावे लागले. तर काही दुचाकीस्वारांना पोलिसांच्या गर्दीतून कसरत करून वाहन पुढे न्यावे लागले. याठिकाणी नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षाचालकांसह आवश्यक कागदपत्र व परवाने नसलेल्या रिक्षाचालकांना अडवून त्यांची तपासणी सुरू असल्याने पोलिसांनी अडवलेल्या रिक्षांची गर्दी आणि सुमारे ९ ते १० पोलीस कर्मचारी व अधिकाºयांनी रस्त्यावर उभे राहून कारवाई केल्याने डावे वळण घेऊन जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने या रस्त्यावरून जाणाºया वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे शहारातील सिग्नलवर डावे वळन वाहनांना न थांबता वळण्यासाठी असल्याने या ठिकाणी वाहनचालक वेगात जात असताना रस्त्यात पोलीस उभे असल्यामुळे त्यांनी अचानक वाहनांना ब्रेक लावले लागत असल्याने काही वाहनांचे अपघात होतानाही वाचल्याचे दिसून आले.
सिग्नलकडे पोलिसांचे दुर्लक्ष
हेल्मेट आणि रिक्षाचालकांवर कारवाई करताना एबीबी सर्कलवर असलेल्या सिग्नलकडे पोलिसांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. रिक्षाचालकांच्या तपासणीसाठी सुरू असेल्या मोहिमेत रिक्षाचालकांना अडवतानाच पोलिसांनी डाव्या वळणावर गप्पांची मैफलही रंगवली होती. त्यामुळे डाव्या वळणाने ठक्कर डोमकडे जाणाºया वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.