गाण्यांच्या माध्यमातून वीजबिलाची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:13 AM2021-04-06T04:13:36+5:302021-04-06T04:13:36+5:30
सातपूर : लॉकडाऊन काळातील वीजबिल भरण्यासाठी सगळे प्रयत्न करुन झाल्यावर महावितरणने अनोखा फंडा अवलंबला आहे. आता थकीत बिलं भरण्यासाठी ...
सातपूर : लॉकडाऊन काळातील वीजबिल भरण्यासाठी सगळे प्रयत्न करुन झाल्यावर महावितरणने अनोखा फंडा अवलंबला आहे. आता थकीत बिलं भरण्यासाठी थेट गाण्यांच्याच माध्यमातून थकबाकीदारांना साद घालण्यात येत आहे. यासाठी महावितरणने एक ऑडिओ क्लिप तयार केली आहे. ‘मालगुडी डेज’ या गाण्याच्या चालीवर ‘कोरोना डेज’ हे तीन मिनिटांचे गाणे रचण्यात आले आहे. ‘लॉकडाऊन काळात महावितरण कंपनीने ग्राहकांना अविरत सेवा दिली आहे. ग्राहकांनीही भरपूर प्रमाणात वीज वापरली आहे. त्यामुळे बिल भरण्याची जबाबदारीदेखील आपलीच आहे’, असे या गाण्यातून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सातपूर येथील सहाय्यक अभियंता प्रदीप गवई यांनी हे गीत रचले व गायले आहे. त्यांना गायनासाठी श्रद्धा कुलकर्णी, तन्वी मनतोडे यांनी सहकार्य केले आहे. संगीतकार नरेंद्र माळवे यांची साथ लाभली असून, अमित चेतन यांनी गाण्याचे रेकॉर्डिंग केले आहे.
चौकट===
कोरोना काळात महावितरणने दिलेल्या सेवेचा मोबदला मिळावा. ग्राहकांमध्ये आमच्याबद्दल असलेला गैरसमज दूर व्हावा. ग्राहकांनी थकबाकी भरुन सहकार्य करावे, हाच या गाण्यामागील उद्देश आहे.
- प्रदीप गवई, सहाय्यक अभियंता, सातपूर