दोनशे कर्मचाऱ्यांच्या भरती उधळला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:19 AM2021-08-21T04:19:45+5:302021-08-21T04:19:45+5:30

जादा विषयात हा विषय रेटून नेण्याचा सत्तारूढ गटाचा प्रयत्न विरोधकांनी हाणून पाडला. महापालिकेच्या महासभेत जादा विषयात हा प्रस्ताव मांडण्यात ...

Recruitment of 200 employees was disrupted | दोनशे कर्मचाऱ्यांच्या भरती उधळला डाव

दोनशे कर्मचाऱ्यांच्या भरती उधळला डाव

Next

जादा विषयात हा विषय रेटून नेण्याचा सत्तारूढ गटाचा प्रयत्न विरोधकांनी हाणून पाडला.

महापालिकेच्या महासभेत जादा विषयात हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता महापालिकेने तयारी आरंभली आहे. त्यात यात नवीन बिटको रुग्णालयासाठी १५० तर डॉ. झाकीर हुोन रुग्णालयासाठी ५० सफाई कर्मचाऱ्यांची आऊटसोर्सिंगद्वारे भरती करण्याचा प्रस्ताव होता. त्यावरून नगरसेवकांना वैद्यकीय अधीक्षकांंनी धक्कादायक माहिती दिली. शहरासह जिल्ह्यात कोरेानाचे रुग्ण कमी हेात असताना प्रत्यक्षात मात्र, रुग्ण वाढत असल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. या कामासाठी घाई असल्याने निविदा न मागवलेली नाही की खर्चाचा अंदाज नाही, अंदाजे प्राकलन नाही, अशा अनेक त्रुटी शिवाजी गांगुर्डे आणि गुरूमित बग्गा यांच्यासह अन्य नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिल्या. त्यावर डॉ. नागरगोजे निरूत्तर झाले. त्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी सविस्तर माहितीसाठी हा विषय तहकूब ठेवला.

इन्फेा..

कर्मचाऱ्यांना फरक मिळणार

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकापोटी राखीव १७९ कोटींची रक्कम देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी केला आहे.तर महापालिकेतील पदोन्नतीही टाळली जात असल्याचा आरोप गुरूमितसिंग बग्गा यांनी केला.

त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी तातडीने फरक देण्याचे तसेच

पदोन्नतीची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचे आदेश दिले.

इन्फो...

महासभेत ठळक मंजूर प्रस्ताव

- पाणीपुरवठ्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणे

- श्वान निर्बिजीकरण कामासाठी १ कोटी रुपयांचा खर्च

- मोफत अंत्यसंस्कार योजनेसाठी ३ कोटी

Web Title: Recruitment of 200 employees was disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.