साडेतीन हजार मागासवर्गीयांची भरती

By admin | Published: June 24, 2016 11:54 PM2016-06-24T23:54:15+5:302016-06-24T23:56:22+5:30

दिवाकर रावते : महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा राज्यस्तरीय कृतज्ञता मेळाव्यात घोषणा

Recruitment of 3 Thousand Backward Classes | साडेतीन हजार मागासवर्गीयांची भरती

साडेतीन हजार मागासवर्गीयांची भरती

Next

नाशिक : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात चालक व वाहक पदांसह सुमारे साडेतीन हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून येत्या १५ दिवसात यासंबंधीची आवश्यक प्रक्रिया सुरू होईल, अशी घोषणा राज्याचे परिवहनमंत्री व परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. तसेच कामगारांचा अनेक दिवसांपासून असलेला वेतन कराराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीचा अहवाल प्राप्त होताच एसटी कर्मचाऱ्यांच्या कामाचा सन्मान करू, समितीच्या सूचनांनुसार कामगार हिताचे निर्णय घेतले जातील, असे आश्वासनही रावते यांनी दिले.
महाराष्ट्र एसटी कामगार सेनेतर्फे येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित राज्यस्तरीय कृतज्ञता मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, माजी मंत्री बबन घोलप, खासदार हेमंत गोडसे,शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, एसटी कामगार सेनेचे सचिव सुनील गणाचार्य आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. याप्रसंगी रावते म्हणाले, एसटी महामंडळातील सर्व कामगार आणि अधिकारी यांना सहा टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुपर स्पेशालिटी रुग्णालयांची सोय उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कामगारांच्या वेतनवाढीची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित असून त्याविषयीही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन रावते यांनी दिले. दरम्यान कोणताही कारखाना टिकला तरच कामगार टिकत असल्याचे सांगत त्यांनी कर्मचाऱ्यांना एसटीची भरभराट झाली तरच कामगारांनाही फायदा होणार असल्याचे सांगतानाच कामगरांना एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी त्यांनी महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांसह दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी व दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची माहिती देताना बसस्थानकांवरील उपहारगृहे केवळ महिला बचतगटांना चालवण्यास देण्यात येणार असल्याचे सांगितले.
तसेच मराठवाड्यातील दहावी ते बारावीच्या विद्यार्थिनींना मोफ त पास, शिवनेरी बसमध्ये महिलांसाठी १० जागा राखीव करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Recruitment of 3 Thousand Backward Classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.