महापालिकेत ५५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 11:39 PM2021-03-22T23:39:27+5:302021-03-23T01:24:51+5:30

नाशिक - शहरात कोरोनाचे संकट वाढल्याने महापालिकेने वैद्यकीय मनुष्यबळ वाढविण्याचे काम सुरू केले असून, २५  एमबीबीएस पदवीधारक  २५  तर ...

Recruitment of 55 Medical Officers in NMC | महापालिकेत ५५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती

महापालिकेत ५५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती

Next
ठळक मुद्देकोरोनाशी लढा: आजपासून मुलाखतींचे सत्र




नाशिक - शहरात कोरोनाचे संकट वाढल्याने महापालिकेने वैद्यकीय मनुष्यबळ वाढविण्याचे काम सुरू केले असून, २५  एमबीबीएस पदवीधारक  २५  तर ३०  बीएएमएस वैद्यकीय भरणार आहे. याशिवाय एकूण  २०९  पदे तातडीने भरण्याची तयारी करण्यात आली आहे.

कोरोनाचे संकट आल्यानंतर महापालिकेच्या यंत्रणेची बरीच दमछाक झाली होती. राष्ट्रीय आरोग्य मिशन तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि अन्य कर्मचारी घेण्यात आले. तीन तीन महिने मुदतवाढ दिल्यानंतर गेल्या ३१ जानेवारीस सर्वांची तात्पुरती सेवाही खंडित करण्यात आली. नंतर आता फेब्रुवारीत कोरोना वाढत असल्याचे दिसू लागल्यानंतर मनुष्यबळ वाढविण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आणि १ मार्चपासून २७६ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. खरे तर ५०० जणांच्या भरतीसाठी तयारी करण्यात आली. परंतु काही उमेदवार रुजू न झाल्याने आता पुन्हा मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच बिटको रुग्णालयात कार्यान्वित केल्या जाणाऱ्या कोरोना प्रयोगशाळेसाठी तंत्रज्ञांची थेट मुलाखतीद्वारे तात्पुरती भरती केली जाणार आहे. २५ एमबीबीएस आणि ३० बीएएमएस डॉक्टर्सचीही भरती करण्यात येणार आहे. एमबीबीएस डॉक्टरांना मासिक मानधन ७५ हजार रुपये तर बीएएएमएस डॉक्टरांना ४०  हजार रुपये देण्यात येणार आहे.


महापालिकेत आजपासून (दि. २३) मुलाखतीची प्रक्रिया सुरू होणार
एमडी मायक्रोबायोलॉजी दोन पदे असून, प्रत्येकी एक लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे. एमएस्सी मायक्रोबायोलॉजीची चार पदे असून, प्रत्येकी ३० हजार रुपये मानधन असेल. प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३० असून, त्यांना प्रत्येकी १७ हजार रुपये, परिचारिका ५० जागा असून, त्यासाठी १७ हजार रुपये, एएनएम ६० जागा असून, प्रत्येकी १५ हजार आणि डाटा एन्ट्री ऑपरेटरची आठ पदे असून, १५ हजार रुपये याप्रमाणे मानधन दिले जाणार आहे.

शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यातच नाशिकरोड येथील ७०० रुग्णांची व्यवस्था आहे. याशिवाय याच रुग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅन यंत्रासाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी पदे भरण्यात येणार आहेत. याठिकाणी असलेली कोविड लॅब सुरू करण्यासाठीदेखील मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याठिकाणी रविवारी (दि.२१) सामग्री दाखल झाली असून, येत्या दोन दिवसात चाचणी करण्यात येणार आहे.

Web Title: Recruitment of 55 Medical Officers in NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.