महापालिकेत ३५२ जागांसाठी भरती प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:14 AM2021-04-20T04:14:39+5:302021-04-20T04:14:39+5:30
नाशिक : महापालिकेने कोरोना संदर्भातील कामकाजासाठी सहा संवर्गातील ३५२ जागांच्या भरतीसाठी अर्ज मागवले होते. यासाठी उमेदवारांच्या मुलाखती ...
नाशिक : महापालिकेने कोरोना संदर्भातील कामकाजासाठी सहा संवर्गातील ३५२ जागांच्या भरतीसाठी अर्ज मागवले होते. यासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली.
महापालिकेचा आकृतीबंध मंजूर नसल्याने अनेक पदे रिक्त असूनही ती भरली जात नाहीत. त्यातच कोरोनाचे आव्हानात्मक काम सुरू असल्याने महानगरपालिकेला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी मनपाने नुकतीच एम. डी. रेडिओलॉजिस्ट, एम. डी. मायक्रोबायोलॉजी, वैद्यकीय अधिकारी एम. बी. बी. एस., आयुष (बी. ए. एम. एस.) वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए. एन. एम., प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा ६ संवर्गातील ३५२ जागा भरण्यासाठी अर्ज मागवून थेट मुलाखती घेतल्या आहेत. गेल्या तीन दिवसात या सहा संवर्गातील उमेदवार भरतीसाठी दररोज मुलाखती घेण्यात येत आहेत. या मुलाखती अंती एम. डी. रेडिओलॉजिस्ट पदासाठी २, वैद्यकीय अधिकारी एम. बी. बी. एस. पदासाठी ६, आयुष (बी. ए. एम. एस.) वैद्यकीय अधिकारी पदासाठी ७६, स्टाफ नर्स पदासाठी ४१, ए.एन. एम. पदासाठी ८७, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी २६ अधिकारी/कर्मचारी उपलब्ध झाले आहेत. या मुलाखती घेतलेल्या उमेदवारांना लगेच नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचेही डॉ. आष्टीकर यांनी सांगितले.