पोलीस बंदोबस्तात सोडले भोजापूर धरणातून आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:21 PM2018-12-01T22:21:05+5:302018-12-01T22:23:03+5:30
नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामासाठी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याची वेळ इतिहासात पहिल्यांदाच घडली. भोजापूर धरणातून आर्वतन सोडण्यापूर्वी पूर्व भागातील बंधाºयात पाणी सोडण्यावरून पेच निर्माण झाला होता; मात्र कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नियोजनानुसार ठरलेल्या गावांना पाणी सोडण्यात आले.
नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामासाठी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याची वेळ इतिहासात पहिल्यांदाच घडली. भोजापूर धरणातून आर्वतन सोडण्यापूर्वी पूर्व भागातील बंधाºयात पाणी सोडण्यावरून पेच निर्माण झाला होता; मात्र कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नियोजनानुसार ठरलेल्या गावांना पाणी सोडण्यात आले.
भोजापूर कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन २७ नोव्हेंबर रोजी भोजापूर धरणातून लाभक्षेत्रातील गावांसाठी १२० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचवेळी फुलेनगर बंधाºयात आरक्षित पाणी सोडावे, यासाठी वावी परिसरातील शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. सदर आवर्तन सोडण्यापूर्वी फुलेनगर बंधाºयात पाणी सोडण्याची मागणी वावी परिसरातील शेतकºयांनी लावून धरली होती. त्यानंतर तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. यावेळी वावी परिसरातील शेतकºयांनी कालव्यात बसून उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पाटबंधारे विभागासमोर मोठा पेच निर्माण झाला होता.
त्यामुळे २७ नोव्हेंबर रोजी सोडण्यात येणारे आवर्तन लांबले होते. मात्र त्यानंतर प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. एस. गोंदकर यांनी धरण पसिररात संवेदनशील भागाची पाहणी केली. त्यानंतर शनिवारी चार वाजता २५ पोलीस कर्मचाºयांच्या बंदोबस्तात धरणातून ७० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील सहा गावांसाठी १६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असून, नियोजनानुसार पहिल्यांदा डाव्या कालव्याद्वारे शेवटच्या टोकाला असलेल्या सोनेवाडी व पिंपळे बंधाºयात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभ क्षेत्रातील गावांना पाणी दिले जाणार आहे. सुमारे १२ दिवस लाभक्षेत्रातील गावांना आवर्तन सुरु राहणार आहे. यावेळी पाटंबधारे विभागाचे शाखा अभियंता बी. डब्ल्यू. बोडके, बी. के. आचट यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.शेतकºयांनी घेतली वाजे यांची भेटआमदार राजाभाऊ वाजे यांनी आवर्तन सोडण्यापूर्वी फुलेनगर, वावी व सायाळे येथील शेतकºयांची वावी येथे भेट घेऊन चर्चा केली. वाजे यांनी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. एस. गोंदकर यांच्यासोबत शेतकºयांची फोनद्वारे चर्चा घडवून आणली. यावेळी सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, सुधाकर भगत यांच्यासह काही शेतकरी उपस्थित होते.१२ दिवस लाभक्षेत्रातील गावांना आवर्तन
संगमनेर तालुक्यातील सहा गावांसाठी १६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असून, नियोजनानुसार पहिल्यांदा डाव्या कालव्याद्वारे शेवटच्या टोकाला असलेल्या सोनेवाडी व पिंपळे बंधाºयात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभ क्षेत्रातील गावांना पाणी दिले जाणार आहे. सुमारे १२ दिवस लाभक्षेत्रातील गावांना आवर्तन सुरू राहणार आहे.