प्रत्येक घरासमोर लाल रंगांच्या बाटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:35 PM2021-06-23T16:35:39+5:302021-06-23T16:36:03+5:30
चांदोरी : कुत्र्यांचे वाढते प्रस्त आणि त्यांचा होणारा त्रास दुर करण्यासाठी केवळ शहरातच नव्हे तर ग्रामिण भागात सद्या प्रत्येक घराच्या दारासमोर लाल रंगाचे पाणी भरलेल्या बाटल्या ठेवलेल्या दिसत आहे. असाच प्रकार निफाड तालुक्यातील अनेक गावात गल्ली व पार्किंग, ओटा, गल्ली, घरासमोर लाल कलरच्या बाटल्या दिसत आहेत. सध्या पावसाळा सुरू झाल्याने या बाटल्यांचे प्रमाण वाढले आहे. या बाटल्या भटक्या श्वानांचा प्रतिबंध करण्यासाठी ठेवल्या जात असल्याचा नागरिकांचा भ्रम आहे. मात्र अशा प्रकारांमुळे श्वानांचा प्रतिबंध होतो यावर प्राणीशास्त्रानुसार कोणतेही तथ्य नसल्याचा दावा पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून केला जात आहे.

सध्यातरी लाल बाटलीची करामत किती दिवस चालणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शहर व ग्रामीण भागात अनेक प्रथा झपाट्याने विकसित होतात. अशातच घर व परिसरात कुंकवाच्या मदतीने लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या तयार करून ठेवल्या जातात. या परिसरात मोकाट श्वान फिरत नसल्याचा दावा अनेक नागरिक करतात. मात्र याबाबत
प्राणीशास्त्रानुसार कोणतेही तथ्य नसून हा केवळ भ्रम असल्याचा दाव प्राणीमित्रांकडून केला जात आहे. या लाल बाटली बाबत मतभिन्नता असली तरी सध्या शहर व ग्रामीण परिसरात अशा लाल बाटल्या रस्त्याच्या कडेला लक्षवेधी ठरत आहेत.
श्वानांमध्ये कलर ओळखण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे या विशिष्ट रंगामुळे श्वानांना भीती बसते. मोकाट श्वानांच्या फिरण्यावर परिणाम होतो. ही संकल्पना शास्त्रीय निकषानुसार चुकीची आहे.
- डॉ. सुनील अहिरे, निफाड तालूका पशुवैद्यकीय अधिकारी.