लाल कांद्याच्या क्षेत्रात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 07:11 PM2018-08-12T19:11:48+5:302018-08-12T19:12:09+5:30

नाशिक : परिसरामघ्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून रिमझिम पावसाने सुरवात झाल्याने पिकाना जीवदान मिळाल्याने असल्याने जरी शेतकरी समाधानी झाला असला तरी विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने लाल कांद्याच्या क्षेत्रा घट होण्याची शक्यता वर्तिवण्यात येत आहे.

Red onion area decreases | लाल कांद्याच्या क्षेत्रात घट

लाल कांद्याच्या क्षेत्रात घट

Next

नाशिक : परिसरामघ्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून रिमझिम पावसाने सुरवात झाल्याने पिकाना जीवदान मिळाल्याने असल्याने जरी शेतकरी समाधानी झाला असला तरी विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने लाल कांद्याच्या क्षेत्रा घट होण्याची शक्यता वर्तिवण्यात येत आहे.
परिसरात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.कांदा या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते. परंतु या वर्षी अजूनही विहिरींना पाणी न उतरल्यामुळे लाल कांद्याची लागवड कशी करावी हां प्रश्न शेतकर्याला पडला आहे. चालु वर्षी खामखेडा परिसरामघ्ये सुरवातीपासून पाउसाची वक्र दृटि होती .सुरवातीची नक्षत्रा समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकर्याने अल्पशय पावसावर मका,बाजरी ,भूईमग ,ज्वारी आदि पिकांची पेरणी केली होती .गेल्या दीड मिहन्यापासून खामखेडा परिसरात अजूनही दमदार पाऊस झाला नाही.फक्त अधून मघून येणार्या रिमझिम पाऊसामुळे पिके जरी चांगली दिसत असली तरी दमदार पाऊस नाही. तेव्हा शेतकर्याची नजर चातक पक्षी सारखी आभाळाकडे लागली आहे .शेतातील पिकांकडे पाहुन जीव कसातरी होत होता.परंतु गेल्याने चार-पाच दिवसापासून अखेर रिमझिम पावसाने हजरी लावल्याने जरी पिकांना जीवदान मिळले असले तरी बळीराजाला अपेक्षा त्याला अपेक्ष मोठ्या पावसाची आहे .या रिमझिम पावसाने विहिरिच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार नाही . काही शेतकरयाकडे महगडी आसे पोळ कांद्याचे बियाणे अजुन घरामध्ये पडून आहे . दिवसोदिवस उन्हाळी कांद्याचे भावात वाढ होत आहे .

Web Title: Red onion area decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी