लाल कांदा आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 06:27 PM2020-12-19T18:27:29+5:302020-12-19T18:27:52+5:30

येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसह अंदरसुल उपबाजार आवारावर लाल कांदा आवकेस सुरुवात झाली असून बाजारभावात मात्र घसरण झाली आहे.

Red onion continues to inward | लाल कांदा आवक सुरू

लाल कांदा आवक सुरू

Next
ठळक मुद्देयेवल्यात बाजारभावात घसरण

येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसह अंदरसुल उपबाजार आवारावर लाल कांदा आवकेस सुरुवात झाली असून बाजारभावात मात्र घसरण झाली आहे.

सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती. तर लाल कांदा आवकेस सुरु झाली असून बाजारभावात घसरण झाल्याचे दिसुन आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यात मागणी सर्वसाधारण होती.

सप्ताहात एकुण कांदा आवक ३४ हजार १३ क्विंटल झाली असुन उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु. ३००० ते कमाल २७९० रुपये तर सरासरी १८०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तर लाल कांद्याचे बाजारभाव किमान रु. ५०० ते कमाल २८४१ तर सरासरी २४०० ाुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.
सप्ताहात गव्हाच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहील्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकुण आवक २३४ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १००० ते कमाल २२२२ रुपये तर सरासरी १५०० रुपयांपर्यंत होते.

सप्ताहात बाजरीची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर आहेत. बाजरीस स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात हरभर्‍याच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात मुगाच्या आवकेत घट झाली त्यामुळे बाजारभावात घसरण झाली. सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सप्ताहात मकाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. मक्यास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते.

Web Title: Red onion continues to inward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.