लाल कांदा दाखल ; सर्वोच्च भाव १२६० रु पये क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 02:27 PM2018-10-03T14:27:55+5:302018-10-03T14:28:14+5:30

उमराणे : येथील स्व. निवृत्ती देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल (पावसाळी) कांदा विक्र ीस येण्यास सुरु वात झाली असुन या कांद्यास सर्वोच्च बुधवारी १२६० रूपये हा सर्वोच्च भाव मिळाला.

Red onion; Highest price is Rs. 1260 quintals | लाल कांदा दाखल ; सर्वोच्च भाव १२६० रु पये क्विंटल

लाल कांदा दाखल ; सर्वोच्च भाव १२६० रु पये क्विंटल

Next

उमराणे : येथील स्व. निवृत्ती देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल (पावसाळी) कांदा विक्र ीस येण्यास सुरु वात झाली असुन या कांद्यास सर्वोच्च बुधवारी १२६० रूपये हा सर्वोच्च भाव मिळाला. दरवर्षी दसर्यानंतरच लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्र ीस येतो.परंतु काही शेतकऱ्यांनी लवकर लागवड केल्याने दस-याच्या आधीच हा कांदा काढणीला आल्याने येथील बाजार समितीत गेल्या आठवड्याभरापासुन अत्यल्प प्रमाणात लाल कांदा  विक्र ीस येण्यास सुरु वात झाली आहे.आज विक्र ीस आलेल्या लाल कांद्यास चालू हंगामातील सर्वोच्च असा १२६० रु पये भाव मिळाला आहे. दरम्यान येथील बाजार समतिीत सद्यस्थितीत उन्हाळी ( गावठी ) कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असुन लाल कांदा बाजारात विक्र ीस आल्याने उन्हाळी काद्यांच्या दरावर याचा परिणाम होणार नसल्याचे व्यापाºयांनी सांगितले. तसेच चालुवर्षी बहुतांश ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने कांदा लागवड अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. त्यातच नद्या, नाले, विहिरींना अद्यापही पाणीच नसल्याने झालेली लाल कांद्याची लागवडही धोक्यात आली आहे.त्यामुळे आगामी काळात लाल काद्यांची आवक वाढेल अशी शक्यता नसुन अजुन काही दिवस तरी उन्हाळ (गावठी) कांद्यावरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
-----------
उमराणे येथील बाजार समितीत लाल ( पावसाळी ) कांदा विक्र ीस येण्यास सुरुवात झाली असुन येथे कांदा खरेदीदार व्यापार्यांची संख्या अधिक असल्याने कांद्याची खरेदी विक्र ी चढ्या दराने होते.त्यामुळे शेतकरी बांधवांनी प्रतवारी करु न कांदा विक्र ीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे व सचिव नितीन जाधव यांनी केले आहे.

Web Title: Red onion; Highest price is Rs. 1260 quintals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक