येवल्यात लाल कांदा आवकेत घट, बाजारभावात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:14 AM2021-02-14T04:14:37+5:302021-02-14T04:14:37+5:30

येवला : सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर लाल कांदा आवकेत घट झाली तर बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. ...

Red onion imports fall in Yeola, market prices rise | येवल्यात लाल कांदा आवकेत घट, बाजारभावात वाढ

येवल्यात लाल कांदा आवकेत घट, बाजारभावात वाढ

Next

येवला : सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर लाल कांदा आवकेत घट झाली तर बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान,

पश्चिम बंगाल तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यात व परदेशात मागणी चांगली होती. सप्ताहात एकूण कांदा आवक ३०,५१० क्विंटल झाली असून लाल कांद्याचे बाजारभाव किमान रु. ७०० ते कमाल रु. ३७७६ तर सरासरी दर ३३५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते.

उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक २२.५६९ क्विंटल झाली असून लाल कांद्याचे बाजारभाव किमान ७०० ते कमाल ४००० रुपये तर सरासरी ३४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते.

सप्ताहात गव्हाच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकूण आवक ७७६ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १४०० रुपये ते कमाल रु. १७२६ तर सरासरी रु. १६०० पर्यंत होते.

सप्ताहात बाजरीच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. बाजरीस स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात बाजरीची एकूण आवक ५१७ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १००० ते कमाल १७०१ रुपये तर सरासरी ११५० पर्यंत होते.

सप्ताहात हरभऱ्याच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. हरभऱ्यास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात हरभऱ्याची एकूण आवक ४४ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु. ३००० ते कमाल रु. ४३७५ तर सरासरी रु. ३८५० पर्यंत होते. सप्ताहात तुरीच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. तुरीस व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. सप्ताहात तुरीची एकूण आवक ८० क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु. ४५०० ते कमाल रु. ७००१ तर सरासरी रु. ५९०० पर्यंत होते.

सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत घट झाली तर बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. सोयाबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. सप्ताहात सोयाबीनची एकूण आवक २६ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु. ३५०० ते कमाल रु. ४६८२ तर सरासरी रु. ४४०० पर्यंत होते. सप्ताहात मक्याची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. मक्यास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात मक्याची एकूण आवक ३०,६९२ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु. ११०० ते कमाल रु. १४१९ तर सरासरी रु. १३०० प्रति क्विंटलपर्यंत होते. उपबाजार अंदरसूल येथे मक्याची आवक ४९५५ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु. ११५० ते १४१६ तर सरासरी रु. १३४० प्रति क्विंटलप्रमाणे होते.

Web Title: Red onion imports fall in Yeola, market prices rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.