लाल कांद्याचे भाव कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:33 PM2018-01-11T23:33:51+5:302018-01-12T01:37:01+5:30

लासलगाव : कांदा पिकावरील वाढविलेले ८५० डॉलरचे प्रतिटन निर्यातमूल्य, लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याची वाढती आवक व गुजरातसह इतर राज्यांतून झालेली कांदा आवक याचा एकूणच परिणाम महाराष्ट्रातील विशेषत: जिल्ह्यात कांदा भावात दररोज वेगाने घसरण होण्यात झाला आहे.

Red onion prices collapsed | लाल कांद्याचे भाव कोसळले

लाल कांद्याचे भाव कोसळले

Next

लासलगाव : कांदा पिकावरील वाढविलेले ८५० डॉलरचे प्रतिटन निर्यातमूल्य, लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याची वाढती आवक व गुजरातसह इतर राज्यांतून झालेली कांदा आवक याचा एकूणच परिणाम महाराष्ट्रातील विशेषत: जिल्ह्यात कांदा भावात दररोज वेगाने घसरण होण्यात झाला आहे.
लासलगावसह जिल्ह्यात सर्वच बाजार आवारात गुरुवारी कांदा भावात घसरण झाली. जोरदार थंडी आणि पोषक हवामान यामुळे एकरी उत्पादन चांगले येत आहे. परंतु आता प्रामुख्याने निफाड, चांदवड व येवला तालुक्यातून कांदा विक्रीकरिता येत आहे. तसेच पुणे, लोणंद भागातील गावठी कांदा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाला आहे.
कांदा लिलाव १५०० ते ३८०० रुपये व सरासरी भाव ३५४० रुपये होते. सोमवारी (दि.८) २१८२४ क्विंटल कांदा लिलाव १८०० ते ३५६१ रुपये, तर सरासरी ३१०० भावाने झाले. मंगळवारी (दि. ९) २२७२४ क्विंटल कांदा १५०० ते ३४६३ व सरासरी २९०० रुपये भावाने लिलाव झाले. मंगळवारी १२०० कांदा वाहनातील कांद्याची आवक असून, किमान १८०० ते सर्वाधिक ३२५० रुपये व सरासरी भाव २७०० रुपये होते. मंगळवारी तुलनेत कमाल भावात २०० तर सरासरी भावात दोनशे रुपयांची घसरण झाली.
लासलगाव येथील जागतिक कांदा बाजारपेठेत कांदा भाव शंभर रुपयांपेक्षा अधिक कमी होत आहेत. कांद्याची भावाची पातळी कमी झाल्यानंतर कांदा उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे.
कांदा विक्र ी कमी भावाने होऊ लागल्यामुळे आर्थिक अडचणीवर मात कशी करावयाची यावरच शेतकरीवर्गाच्या गप्पा बाजार आवारात होताना दिसून आल्या. देशांतर्गत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. देशात मागणीच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणात येत असून, बाजारभावात घसरण होत आहे. गेल्या दोन महिने कांद्याचे बाजारभाव वाढलेले होते. मात्र यावर्षी पावसाने सरासरीपेक्षा दमदार हजेरी लावल्याने लाल कांद्याचे लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

Web Title: Red onion prices collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक