लाल कांदा दरात घसरण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:37 PM2020-02-04T12:37:07+5:302020-02-04T12:37:18+5:30

लासलगांव : येथील बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कमाल भावात ६०० रूपयांची घसरण झाली. २०७१ रूपये हा सर्वाधिक दर जाहीर करण्यात आला.

 Red onion prices continue to fall | लाल कांदा दरात घसरण सुरूच

लाल कांदा दरात घसरण सुरूच

googlenewsNext

लासलगांव : येथील बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कमाल भावात ६०० रूपयांची घसरण झाली. २०७१ रूपये हा सर्वाधिक दर जाहीर करण्यात आला. सरासरी भावाची पातळी ४५० तर किमान भावाची पातळी दोनशे रूपयानी कमी होत किमान भाव ९०० रूपये जाहीर झाला.मागील सप्ताहाच्या तुलनेत कमाल भावात हजार रूपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांत चिंतेचे वातावरण आहे.सोमवारी मागील सप्ताहाचे तुलनेत ५५० रूपयांची घसरण झाली. बाजारात १२०३० क्विंटल कांदा आवक झाली असुन लाल कांदा किमान ११०० ते कमाल २४४२ व सरासरी २१०० रूपये भाव जाहीर झाले. गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची १,२५,९४५ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये १,१०० कमाल रु पये ३,०२६ तर सर्वसाधारण रु पये २,६२२ प्रती क्विंटल राहिले. गत सप्ताहात निफाड उपआवारावर लाल कांदा (१७,५०६ क्विंटल) भाव रु पये १,००० ते ३,१८१ सरासरी रु पये २,६२५, तर विंचुर येथील उपावारावर लाल कांदा (८६,३३३ क्विंटल) भाव रु पये १,००० ते ४,१५१ सरासरी रु पये २,४५० रूपये होते.

Web Title:  Red onion prices continue to fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक