लाल कांदा दरात २५०० रूपयांची घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:51 PM2019-12-20T12:51:35+5:302019-12-20T12:51:43+5:30
लासलगांव येथील बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याच्या दरात तब्बल २५०० रूपयांची घसरण झाली.
लासलगांव येथील बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याच्या दरात तब्बल २५०० रूपयांची घसरण झाली. मंगळवारच्या तुलनेत तीन दिवसांतच चार हजार रूपयांची तर गुरूवारच्या तुलनेत २५०० रूपयांची घसरण होत ११५० वाहनातील १२२६७ क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला सकाळी किमान २२०० ते कमाल ७१५१ व सरासरी ५९०१ रूपये भावाने विक्री झाला. दरम्यान, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत ९१ पिकअप आणि ७ ट्रॅक्टरमधून सुमारे ५६० क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता. कमीत कमी १ हजार, जास्तीत जास्त ९०४५ आणि सरासरी ७ हजार रूपये क्विंटल दराने कांदा विकला गेल्याची माहिती सभापती विनायक तांबे, सचिव विजय विखे यांनी दिली. लाल कांद्याच्या आवकेत काहीशी वाढ होताच कांद्याच्या दरात प्रति क्विंटल १ हजाराने घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.बाजार समिती आवारात सोमवारी लाल कांद्याला उच्चांकी १०,५५५ रु पये प्रति क्विंटल दर मिळाला होता. दोडी उपबाजारात बुधवारी १३०५ क्विंटल कांद्याची गोण्यांमधून आवक झाली होती. यावेळी उच्चांकी ९१०० हजार रु पये तर सरासरी ४८०० रूपये क्विंटल दराने कांद्याची विक्र ी झाली.