लाल कांदा दरात २२०० रूपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:31 PM2019-12-09T12:31:06+5:302019-12-09T12:31:17+5:30

लासलगाव : शासनाच्या कांदा साठवणुकीवर होणाऱ्या कारवाईच्या संभाव्य भीतीने व्यापारी वर्गाने कांदा खरेदीत हात आखडता घेतल्याने सोमवारी सकाळी लाल कांदा दरात एकाच दिवशी २२०० ते ४६०० रूपयांनी इतक्या वेगाने घसरण झाली.

 Red onion prices fell by Rs | लाल कांदा दरात २२०० रूपयांनी घसरण

लाल कांदा दरात २२०० रूपयांनी घसरण

Next

लासलगाव : शासनाच्या कांदा साठवणुकीवर होणाऱ्या कारवाईच्या संभाव्य भीतीने व्यापारी वर्गाने कांदा खरेदीत हात आखडता घेतल्याने सोमवारी सकाळी लाल कांदा दरात एकाच दिवशी २२०० ते ४६०० रूपयांनी इतक्या वेगाने घसरण झाली. एकच वेळी भाव घसरले त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. लासलगांव बाजार समितीत सोमवारी सकाळी सत्रात शनिवारच्या तुलनेत २२०० तर शुक्र वारच्या तुलनेत ४६०० रूपये कमाल भावात घसरण झाली. सकाळी ५२२ वाहनातील ५२४८ क्विंटल लाल कांदयाला किमान २१०० ते कमाल ५६०१ रूपये तर सरासरी ४२०० रूपये भाव जाहीर झाला. शनिवार दिनांक ७ डिसेंबर रोजी २२२ वाहनातील १८४८ क्विंटल लाल कांदा किमान २४०० ते कमाल ८७०० व सरासरी ७१०० रूपये भावाने विक्र ी झाला होता. वाढलेली कांदा आवक लवकरात लवकर इतर राज्यांत पोहचवायला यंत्रणा गमिमान करण्याची गरज असतांना उलट कांदा रवाना होणार नाही असेच धोरण शासन कांदा साठवणुकीवर मर्यादा घटवुन करीत आहे. वाढलेली कांदा आवक लवकरात बाहेर जाण्याकरीता असलेली तहसीलदार कार्यालयाची यंत्रणा वापरून कांदा रवाना करण्यावर प्रभारी जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी कांदा अभ्यासकांशी चर्चा करून ही वस्तुस्थिती राज्य प्रशासन व केंद्र प्रशासनास अवगत केली नाही तर कांदा भाव कोसळले. नवीन कांदा जर काही दिवस उत्पादकांनी बाजारात विक्र ीला आणला नाही तर देशाची कांदा मागणी पुरवठा होण्यासाठी अडसर होण्याची शक्यता आहे.

Web Title:  Red onion prices fell by Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक