लाल कांदा दरात वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 02:28 PM2019-12-21T14:28:06+5:302019-12-21T14:29:29+5:30

वणी : येथील उपबाजार आवारात लाल कांद्यातील दरामुळे उत्पादकांच्या चेहऱ्यावर लाली पसरली असुन उत्पादनाचे प्रमाण कमी असले तरी सद्यस्थितीत मिळणा-या दरामुळे उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

 Red onion prices rise! | लाल कांदा दरात वाढ !

लाल कांदा दरात वाढ !

Next

वणी : येथील उपबाजार आवारात लाल कांद्यातील दरामुळे उत्पादकांच्या चेहऱ्यावर लाली पसरली असुन उत्पादनाचे प्रमाण कमी असले तरी सद्यस्थितीत मिळणा-या दरामुळे उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शुक्र वार व शनिवार अशा दोन दिवसात २५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. शुक्र वारी १८५ वाहनामधुन १४०० क्विंटल आवक झाली. ७५०१ कमाल, ४००० किमान तर ५२५० सरासरी प्रती क्विंटलचा दर मिळाला. तर शनिवारी ११०० क्विंटल आवक १६४ वाहनामधुन उपबाजारात झाली. ७६७६ कमाल, ३७५१ किमान तर ५५७५ सरासरी प्रति क्विंटल अशा भावाने कांदा खरेदी विक्र ी व्यवहार पार पाडण्यात आले. शुक्र वारपेक्षा शनिवारी दरात काहीशी सुधारणा झाली.थोड्या फार फरकाने दरात चढ उतार असला तरी दरातील सातत्य उत्पादक व व्यापारी  यांच्यातील व्यवहार हा सकारात्मक असल्यामुळे लाल कांद्याची लाली उत्पादकांच्या चेह-यावर पसरली आहे.

Web Title:  Red onion prices rise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक