लाल कांदा दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 02:18 PM2019-12-25T14:18:13+5:302019-12-25T14:18:20+5:30
लासलगाव : येथील बाजार समितीत बुधवारी कांदा भाव ८६०० रूपयांपर्यंत पोहाचले. दुपारपर्यंत ८५० वाहनातील लिलाव झाले असून भाव वाढण्याची शक्यता आहे.
लासलगाव : येथील बाजार समितीत बुधवारी कांदा भाव ८६०० रूपयांपर्यंत पोहाचले. दुपारपर्यंत ८५० वाहनातील लिलाव झाले असून भाव वाढण्याची शक्यता आहे. हंगामात मंगळवारी प्रथमच लाल कांद्याची विक्रमी आवक झाली. लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची १५२०४ क्विंटल आवक झाली असून, किमान दर २००१, जास्तीत जास्त ८१०० तर सरासरी दर ६००१ रुपयांपर्यंत होते. लासलगाव बाजार आवारात मागील सप्ताहापासून कांदा आवक वाढली आहे. सोमवारी सकाळपासूनच कांदा घेऊन येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सद्यस्थितीत सरासरी बाराशेपेक्षा अधिक वाहनांमधून आवक होत आहे. परिणामी लासलगाव-चांदवड, लासलगाव-पिंपळगाव बसवंत, लासलगाव-निफाड व लासलगाव-पाटोदा या रस्त्यांवर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या मार्गाने जाणाºया वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यात प्रवाशांचे हाल झाले.