पोलीस आयुक्तांच्याच आदेशाला रेड सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 09:32 PM2020-11-20T21:32:30+5:302020-11-21T00:48:24+5:30
ओझर : मुंबई-आग्रा महामार्गावर गरवारे पॉइंट येथील काही दिवसांपासून बंद असलेली पावती फाड मोहीम पुन्हा जोमाने सुरू झाल्याने वाहनधारक जीव मुठीत घेऊन ब्रेक लावत आहे. याबाबत लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब उघडकीस आली आहे.
ओझर : मुंबई-आग्रा महामार्गावर गरवारे पॉइंट येथील काही दिवसांपासून बंद असलेली पावती फाड मोहीम पुन्हा जोमाने सुरू झाल्याने वाहनधारक जीव मुठीत घेऊन ब्रेक लावत आहे. याबाबत लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. कोरोनामध्ये झालेल्या लॉकडाऊनमुळे महामार्गावर ओझरपासून पाच किलोमीटरवर एक चेक पोस्ट टाकण्यात आली होती. त्यावेळी असलेल्या नियमांना बॅरिकेड्स लावून अतिशय शिस्तीच्या चौकटीत बसवण्याचे काम उपस्थित पोलिसांकडून सद्रक्षणायसारखे झाले होते. लॉकडाऊनची शिथिलता आता कमी झाली आहे. परराज्यात गेलेल्या जथ्यांची पोटवापसी झाली. त्यांना पूर्ण प्रवासात नेमके ओझरच्या डीआरडीओ जवळ ब्रेक लावून भुर्दंड हमी होत असल्याने स्थानिक व बाहेरील वाहनधारक पुरते त्रस्त झाले होते. त्यानंतर पाटील पेट्रोल पंपाजवळील चौकी ही आयुक्तालयाच्या अखत्यारित येत असल्याचे निष्पन्न झाले. ही बाब आयुक्तांपर्यंत गेल्यावर त्यांनी यापुढे वाहनधारकांना कुणीही अडवणार नसून ते काम आरटीओचे असल्याचे जाहीर केल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना कळले. यामुळे ती कित्येक दिवस बंद झाल्यावर सर्वत्र समाधान व्यक्त केले जात होते, परंतु पुन्हा दोन दिवसांपासून भर महामार्गावर वाहतूक पोलीस रस्त्यात येत असल्याचे प्रकार सुरू झाल्याने पोलिसांनादेखील अपघाताचा धोका अधिक वाढला आहे, तर वाहनधारकांनादेखील मोठ्या हिमतीने ब्रेक लावावे लागत आहे. ही वसुली थांबविण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे. (२० ओझर १)
--------------
नाशिक ते पिंपळगाव हा सहापदरी रस्ता आहे. त्यामुळे सर्वच वाहनांची वर्दळ येथे कायम असते. ज्या तिसऱ्या लेनच्या मध्यभागी गाड्या अडविल्या जातात तेथून अनेक दुचाकीस्वार वेगात असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता तितकीच जास्त आहे. अशीच परिस्थिती कोकणगावजवळसुद्धा बघायला मिळते. येथे तर कधी कधी दुसऱ्या लेनच्या मध्यभागी बॅरिकेड्स लावून गाड्या साइडला लावल्या जातात. अनेक शेतकऱ्यांनीदेखील ही व्यथा व्यक्त केली.