लालपरीची चाके पुन्हा रूतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:14 AM2021-04-21T04:14:35+5:302021-04-21T04:14:35+5:30
मालेगाव आगाराच्या बस, नाशिक, पुणे, मुंबई, गुजरात आदी लांब ठिकाणच्या पल्ल्याला जात होत्या. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व प्रवाशांच्या ...
मालेगाव आगाराच्या बस, नाशिक, पुणे, मुंबई, गुजरात आदी लांब ठिकाणच्या पल्ल्याला जात होत्या. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व प्रवाशांच्या घटलेल्या संख्येमुळे बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ४५ वर्षांच्या पुढील लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महापालिका व आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला आहे. मात्र, लसीकरण केले जात नसल्याची माहिती आगारप्रमुख के. व्ही. धनवटे यांनी दिली. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांवर करण्यात आली आहे. बस आगारात आल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून सॅनिटाईझ केली जात आहे.
---------------------
१३२ कर्मचाऱ्यांचे लसीकरण
मालेगाव आगाराकडे ५५ बसेस आहेत. दररोज केवळ नाशिक, मनमाड, चाळीसगाव मार्गावर बस फेऱ्या सुरू आहेत. १० ते १२ बस फेऱ्या होत असून, आगाराला ३० ते ४० हजारांचे उत्पन्न मिळत आहे. तब्बल साडेचार ते पाच लाख रुपयांच्या उत्पन्नाला आगाराला मुकावे लागत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे ७ कर्मचारी बाधित झाले होते. आगारात ४३२ कर्मचारी असून, त्यात १५७ चालक, १३७ वाहक, ३३ चालक कम वाहक व इतर ५९ असे ४३२ कर्मचारी आहेत. यापैकी १३२ जणांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले आहे.
-----------------
फोटो फाईल नेम : २० एमएपीआर ०१ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव आगारात प्रवाशांअभावी उभ्या असलेल्या गाड्या.
फोटो फाईल नेम : २० एमएपीआर ०२ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव आगारात बसला सॅनिटायझर फवारणी करताना कर्मचारी.
फोटो फाईल नेम : २० एमएपीआर ०३ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव आगारातील बसस्थानकावर प्रवाशांची तुरळक गर्दी.
===Photopath===
200421\20nsk_1_20042021_13.jpg~200421\20nsk_2_20042021_13.jpg~200421\20nsk_3_20042021_13.jpg
===Caption===
फोटो कॅप्शन बातमीसोबत दिले आहेत.~फोटो कॅप्शन बातमीसोबत दिले आहेत.~फोटो कॅप्शन बातमीसोबत दिले आहेत.