आदिवासींच्या जमिनी अडकल्या लालफितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:39 AM2017-09-04T00:39:35+5:302017-09-04T00:39:42+5:30
गेल्या ३ पिढ्यांपासून तालुक्यातील आदिवासी बांधव वनजमिनी कसत असून, शासन दरबारी वारंवार चकरा मारु न सर्व कागदपत्रांची पुर्तता करुनही लालफितीत अडकलेल्या जमिनी आदिवासी बांधवांना मिळत नाही.
येवला : गेल्या ३ पिढ्यांपासून तालुक्यातील आदिवासी बांधव वनजमिनी कसत असून, शासन दरबारी वारंवार चकरा मारु न सर्व कागदपत्रांची पुर्तता करुनही लालफितीत अडकलेल्या जमिनी आदिवासी बांधवांना मिळत नाही.
अंगूलगाव, तळवाडे, ममदापूर, सोमठाणजोश, खरवंडी, देवदरी, कानडी, बोकटे, भुलेगाव आदी गावांमध्ये चांगल्या प्रकारे आदिवासी बांधव जमीन कसत आहे. पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड यांनी तालुक्यात ज्या आदिवासी बांधवांनी जमीन कसली आहे. त्यांची भेट घेऊन योग्य प्रस्ताव करु न शासनाकडे सादर करण्यासाठी कार्यवाही चालु केली. यामध्ये खरवंडी, देवदरी, अंगुलगाव येथील प्रस्ताव जिल्हाधिकारी, वनसमितीकडे पाठवण्यात आले आहे. जिल्हाधिकाºयांनी प्रत्येक तालुक्यातील वनसमिती गठीत करण्यासाठी आदेश दिले आहे. परंतु आज पर्यंत येवला तालुक्यात वन समिती गठीत करण्यात आली नसून जिल्हाधिकाºयांच्या पत्राची दखल सुद्धा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी घेतलेली दिसून येत नाही. आदिवासींनी सर्व कागदपत्रे देऊन सुद्धा त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील आदिवासी बांधवांचा संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील आदिवासींना घेऊन गायकवाड आंदोलन करणार आहे.
याप्रसंगी सोमठाणजोश येथील आदिवासी बांधवांनी आपण कसत असलेल्या वनजमिनी पाहणी प्रसंगी सातार्?याचे माजी सरपंच प्रा. खंडु बहीरम, यांनी केला. याप्रसंगी आनंदा सोनवणे, कारभारी सोनवणे, मिराबाई मोरे, कल्पनाबाई सुरासे, सोपान ठाकरे, गोपाळ ठाकरे, हिराबाई सोनवणे, हरि ठाकरे आदी उपस्थित होते.