टोमॅटोची लाली घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:15 AM2021-01-20T04:15:18+5:302021-01-20T04:15:18+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील उत्पन्न बाजार समितीत गेली चार महिने तेजीत असलेले टोमॅटोचे दर अवघे एक रुपया किलोवर ...

The redness of the tomatoes faded | टोमॅटोची लाली घसरली

टोमॅटोची लाली घसरली

Next

पिंपळगाव बसवंत : येथील उत्पन्न बाजार समितीत गेली चार महिने तेजीत असलेले टोमॅटोचे दर अवघे एक रुपया किलोवर आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २० किलोचे कॅरेट २० रूपयांना विकले जात आहे.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात टोमॅटोचा हंगाम असतो. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी टोमॅटोला उच्चांकी बाजार २० किलोच्या कॅरेटला २५५ पासून ९०१ पर्यंत डिसेंबर या कालावधीत दर मिळाला. परंतु जानेवारीत अवघे २० रूपयांवर आल्याने टोमॅटोवर शेतकऱ्यांनी नांगर फिरवला. ऑगस्ट महिन्यातच टोमॅटोला ४०० ते ८८५ रूपयांपर्यंत दर प्रति कॅरेट मिळताच या पिकाच्या लागवडीकडे शेतकरी वर्ग पुन्हा वळला गेला. यावर्षी द्विधा मनस्थितीत असलेल्या शेतकऱ्यांना टोमॅटोमुळे चांगलाच आर्थिक फायदा झाला. अनेक शेतकऱ्यांचे द्राक्ष बाग लाॅक डाऊनकाळात सापडल्याने आठ ते दहा रूपये दराने द्राक्ष द्यावे लागले होते. यातीलच काही शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केल्याने कमी दिवसात द्राक्षापेक्षाही जास्त पैसे मिळाले. एकरी जवळपास पंधरा लाख रूपयापर्यंत उत्पन्न मिळाल्याने अनेक शेतकरी फायद्यात होते. यंदा अनेक राज्यात टोमॅटो लागवड करण्यात आली. दुबई. बांगलादेश आदी भागात स्थानिक टोमॅटोचे पीक आल्याने भारतातून मागणी बंद झाल्याने टोमॅटोचे दर कमी झाले .

-----------------------

मागील वर्षी बाजार समितीत १ कोटी ४० लाख ३२ हजारपर्यंत कॅरेट टोमॅटोची झाली होती. बाजारभाव पण चांगले होते. जवळपास ४८७ कोटी ६५ लाखांची आर्थिक उलाढाल बाजार समितीत झाली. यावर्षी लाॅकडाऊन असताना देखील जवळपास १ कोटी ४९ लाख कॅरेटची आवक बाजार समितीत आली होती. यातून ६५५ कोटी ३१ लाखांची आर्थिक उलाढाल बाजार समितीत झाली. मागील वर्षाच्या तुलनेत १६८ कोटींची उलाढालीत वाढ झाली. यावर्षीच टोमॅटोचा दर डिसेंबर महिन्यापर्यंत २५५ ते ७०० पर्यंत होता. जानेवारीत अचानक १ ते २ रूपये किलोवर आला. यंदा अनेक राज्यात टोमॅटो लागवड करण्यात आली. दुबई. बांगलादेश आदी भागात स्थानिक टोमॅटोचे पीक आल्याने भारतातून मागणी बंद झाल्याने टोमॅटोचे दर कमी झाले . (१९ पिंपळगाव १)

--------------------

शेतकरी आधीच लाॅकडाऊनमध्ये द्राक्ष सारख्या पिकात होरपळून निघाला. शेतकरी वर्गाला टोमॅटो लागवडीसाठी आवाहन केले व त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत गेला. परिणामी अनेक शेतकरी वर्गाची नुकसान टोमॅटोमुळे भरून निघाली. या मुळे शेतकरी व बाजार समितीस आर्थिक फायदा झाला.

आमदार दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बाजार समिती

-----------------------

माझे द्राक्ष लाॅकडाऊन काळात अवघे सात रूपये दराने विक्री झाले होते. मोठा फटका सहन करत एकच एकर टोमॅटो लावले पण जवळपास पंधरा लाखापर्यंत उत्पन्न मिळाल्याने खूप बरे झाले. त्यामुळे द्राक्ष पिकाचे नुकसान भरून निघाले.

-सुभाष काशिनाथ शिंदे, शेतकरी, रा. शिंदे ता.चांदवड

===Photopath===

190121\19nsk_6_19012021_13.jpg

===Caption===

१९ पिंपळगाव १

Web Title: The redness of the tomatoes faded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.