यंत्रमाग उद्योगावरील विजेचे शुल्क कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:45 PM2018-11-29T23:45:23+5:302018-11-30T00:39:55+5:30
आझादनगर : यंत्रमाग उद्योगावरील वीज वितरणकडून २७ अश्वशक्तीपेक्षा कमी वापर करणाऱ्या ग्राहकांना लावण्यात आलेला पॉवर फॅक्टर शुल्क त्वरित कमी ...
आझादनगर : यंत्रमाग उद्योगावरील वीज वितरणकडून २७ अश्वशक्तीपेक्षा कमी वापर करणाऱ्या ग्राहकांना लावण्यात आलेला पॉवर फॅक्टर शुल्क त्वरित कमी करण्यात यावे, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दूरध्वनीवरून कार्यकारी अभियंता भामरे यांना दिले.
ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार शेख आसिफ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर त्यांनी वरीलप्रमाणे आदेश दिले. वीज दर नियामक मंडळाच्या नवीन कायद्यान्वये मंजुरीपेक्षा जास्त बिल वापर करणाºया ग्राहकांना दंड लावण्यात येत आहे व पॉवर फॅक्टर शुल्क लादण्यात येऊन वाढीव वीजदेयके येत होते. या समस्येने त्रस्त मालेगाव येथील पॉवरलूम उद्योग विकास समिती व भिवंडी येथील संघटनांनी आज राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार आसिफ शेख, आमदार अबु आझमी, भिवंडीचे आमदार रूपेश म्हात्रे, महेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी २७ अश्वशक्तीपेक्षा कमी वीज ग्राहकांना पॉवर फॅक्टर शुल्क लागू नसूनही वीज ग्राहकांना शुल्क लागून येत आहेत. यावर मंत्री महोदयांनी त्वरित शुल्क कमी करण्यात यावे, असे आदेश दिले. तसेच ज्या ग्राहकांनी शुल्क भरले असेल त्यांना वीजदेयकात आगाऊ रक्कम जमा धरण्यात येईल. खासगी वीज पुरवठादार ठेकेदारांचे वीज मीटर १२ टक्के अधिक वेगाचे असल्याचे निदर्शनास आणून दिले असता यापुढे सर्व वीज मीटर हे महावितरणचे लावण्यात येतील असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.
बैठकीत शहरातील यंत्रमाग संघटनांसह वीज ग्राहकांच्या अडचणी ऐकून घेण्यात येतील. त्यावरून पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी यावेळी शिष्टमंडळास दिले.
शिष्टमंडळात तालुका पॉवरलूम उद्योग विकास समितीचे अध्यक्ष साजीद अन्सारी, अन्वर अजीज, निहाल दानेवाला, खालीद मोईन, साजिद अली, भिवंडीचे हनीफ बाबा, हिरेन नागदा, अरफात शेख, अनीस अन्सारी, श्याम अग्रवाल यांचा समावेश होता.वीज वितरणच्या अधिकाºयांची उपस्थितीऊर्जामंत्र्याच्या भेटीवेळी सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. त्याची अंमलबजावणी न झाल्यास यंत्रमाग उद्योग विकास समिती उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती खालीद मोईन यांनी दिली. टोरॅटो या खासगी वीज पुरवठा करणाºया कंपनीच्या मनमानी कारभाराबाबत भिवंडीच्या यंत्रमागधारकांनी तक्रार केली. हाच धागा पकडून मालेगावसारख्या छोट्या यंत्रमाग उत्पादनाच्या शहरात खासगी ठेकेदारास ठेका दिला तर उद्योग बंद पडण्याची भीती आमदार शेख आसिफ यांनी व्यक्त केली. त्यावर मालेगाव येथे पुढील आठवड्यात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात वीज वितरणच्या अधिकाºयांसह मुंबई येथून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना बोलविण्यात येणार आहे.