शिक्षण संक्रमणाची वाढीव फी कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 03:30 PM2020-08-24T15:30:23+5:302020-08-24T15:31:00+5:30

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या कडून शिक्षण संक्रमण मासिक प्रत्येक महिन्यात प्रकाशित केले जाते ...

Reduce increased fees for education transition | शिक्षण संक्रमणाची वाढीव फी कमी करा

शिक्षण संक्रमणाची वाढीव फी कमी करा

Next
ठळक मुद्देनाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे नाशिक विभागीय शिक्षण मंडळाला निवेदन

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या कडून शिक्षण संक्रमण मासिक प्रत्येक महिन्यात प्रकाशित केले जाते त्यात फार महत्वपुर्ण व शाळांना उपयुक्त अशी माहिती असते पण हे मासिक बऱ्याच
वर्षापासून शाळांना पोहचत (मिळत)नाही.या अंकाची फी २००रु.वरून २५०रु.केली व प्रत्येक शाळेला १ ऐवजी २ अंक घेऊन ५००रु.सक्तीने भरण्यास सांगितले.

हे दोन अंक शाळांना पोहचतील का?याचा विचार न करता फक्त फी वसूल करणार का? याबाबत मुख्याध्यापक संघाने वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही म्हणजे हा फक्त कोविड १९ या महामारीच्या काळात पैसे वसूल करण्याचाच प्रकार आहे का?असे प्रश्न मुख्याध्यापक विचारू लागले आहे.तेव्हा या बाबत मंडळाने त्वरित खुलासा करून एका शाळेला एकच अंक देवून फी २००रु.ठेवून तो अंक वेळेत शाळेत पोहचेल याची काळजी घ्यावी अशा आशयाचे निवेदन विभागीय मंडळाचे सचिव मा.नितीन उपासनी साहेब यांना मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष एस. बी.  शिरसाठ, सचिव एस. बी. देशमुख,उपाध्यक्ष राजेंद्र सावंत, प्रदीप सांगळे, शरद गिते, भरत गांगुर्डे, अनिल देवरे, दीपक ह्याळीज, डी. एस. ठाकरे, आर. एस. गायकवाड, बी. के. नागरे, सुरेश  घरटे, ए. के. मोरे, बी. एस. गांगुर्डे, एम. के. भदाणे, राजेंद्र महात्मे, ए. व्ही. पानसरे, जे. सी. निकम यांनी निवेदन दिले.
यावेळी मागील सभेचे इतिवृत्त मिळणे,१० वी व १२ वी परीक्षा केंद्राचे विभाजन करणे,मुख्याध्यापक व जेष्ठ शिक्षकांना परीक्षा कामात सूट देणे,परीक्षाच्या मानधनात वाढ करणे,नवीन शाळा सांकेतांक क्रमांक देतांना वाढीव फी न आकारणे, मार्च २०२० साठी कस्टडी घेतलेल्या शाळांमधील साहित्य त्वरित मंडळात आणणे व मंडळ मान्यता वर्धित व कायम करणे हा विषय पुर्ण बंद करून सर्वच शाळांना कोणतीही फी न घेता मान्यता वर्धित आणि कायम करणे.यावर विभागीय सचिव  नितीन उपासनी यांनी सकारात्मक चर्चा केली. प्रास्ताविक एस. बी. देशमुख यांनी केले तर प्रश्नाची मांडणी अनिल देवरे यांनी केली तर आभार दीपक ह्याळीज यांनी मानले. यावेळी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी एस. के. सावंत, एस. बी. शिरसाठ, एस. बी. देशमुख, सुरेश शेलार, गुफरान अन्सारी, सुनिल देशमुख, माणिक मढवई, राजेंद्र सावंत, बी. के. शेवाळे, पुरुषोत्तम रकिबे, परवेझा शेख, संगीता बाफना, नंदराज देवरे, बी. डी. गांगुर्डे, अशोक कदम, एम. व्ही. बच्छाव, साहेबराव पाटील, किशोर पालखेडकर, दीपक ह्याळीज, डी. एस. ठाकरे, प्रदीप सांगळे, कैलास वाकचौरे, एस. जी. वाळूज,  के. एम. महाले, आर. डी. चव्हाण, डी. बी. वाघ, मंजुषा रायते, जयश्री पानगव्हाणे, एल. के. वाघ, श्रीमती कदम, गांडुळे, आर. एम. खरोटे उपस्थित होते.

 

Web Title: Reduce increased fees for education transition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.