इंधन, रासायनिक खतांची दरवाढ कमी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:15 AM2021-05-21T04:15:28+5:302021-05-21T04:15:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : इंधन व रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडल्याने केंद्र सरकारने यात त्वरित लक्ष घालून ही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : इंधन व रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडल्याने केंद्र सरकारने यात त्वरित लक्ष घालून ही दरवाढ कमी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देण्यात आले आहे. संपूर्ण जगासह देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले असून, सिन्नर तालुकाही यातून सुटलेला नाही. या परिस्थितीत पेट्रोल, डिझेल व रासायनिक खतांच्या दरवाढीने उच्चांक गाठला आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य व शेतकर्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे इंधन व रासायनिक खतांच्या किमती कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष संदीप भालेराव, रायुकाँचे तालुका उपाध्यक्ष निखील गडाख, तालुका सरचिटणीस प्रवीण जगताप, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
----------------
सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप भालेराव, निखील गडाख, प्रवीण जगताप यांनी निवेदन दिले. (२० सिन्नर १)
===Photopath===
200521\20nsk_6_20052021_13.jpg
===Caption===
२० सिन्नर १