अवकाळी पावसामुळे फुलकळ्या गळून पडल्याने अॅपल बोरांच्या उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 06:04 PM2019-12-18T18:04:44+5:302019-12-18T18:06:31+5:30
मानोरी : दीड महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अॅपल बोरच्या झाडांना बसला असून अवकाळी पाऊस बरसण्याच्या दरम्यान या अॅपलबोर फळ झाडांना लागलेल्या फुलकळ्या गळून पडल्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याहून अधिक घट उत्पादनात झाली आहे.
मानोरी : दीड महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अॅपल बोरच्या झाडांना बसला असून अवकाळी पाऊस बरसण्याच्या दरम्यान या अॅपलबोर फळ झाडांना लागलेल्या फुलकळ्या गळून पडल्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याहून अधिक घट उत्पादनात झाली आहे.
येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी भिवाजी गोडगे यांना गतवर्षी अॅपल बोर मधून एक लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. यंदा देखील मोठ्या अपेक्षेप्रमाणे लाखो रु पये खर्चून अॅपल बोरचे उत्पादन घेतले होते. मात्र फुलकळ्या गळून पडल्याने यंदा अॅपल बोरच्या उत्पादनात घट झाली आहे.
पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत गोडगे यांनी मोठ्या मेहनतीने एक एकर शेतात अॅपल बोर फळबाग लागवड केली आहे. १० बाय १५ ईतक्या अंतरावर या अॅपल बोरच्या झाडांची लागवड केली आहे. ही झाडे जोपासण्यासाठी लाखो रु पये खर्च करून शेत हिरवेगार केले आहे. मात्र दीड महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने या अॅपल बोरांच्या झाडांना लागलेल्या फुलकळ्याच गळून पडल्याने शेतकरी चिंतातुर झालेला असताना त्याचा परिणाम आता थेट बोरांच्या उत्पादनावर होत असल्याचे दिसून आले आहे.
मागील वर्षी फुलकळ्या लागल्या नंतर एका झाडाला कमीत कमी तीन कॅरेट्स म्हणजेच साथ किलो इतके बोरांचे भरगोस उत्पादन निघत असताना भाव देखील चांगल्या प्रकारे मिळत होता. यंदा मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्याने झाडांच्या फुलकळ्या गडून पडल्याने अॅपल बोरांचे उत्पादन घटले असून एका झाडाला केवळ एकच कॅरेट्स म्हणजेच वीस किलो इतके फळ निघत असल्याने व भाव देखील कमी प्रमाणात मिळत असल्याने उत्पादन खर्च फिटणे देखील यंदा महाग झाला आहे. येवला, लासलगाव, कोपरगाव, निफाड आदी बाजार समित्यांमध्ये अॅपल बोरांना प्रतिकिलो पंचवीस ते तीस रु पयांपर्यंत भाव मिळत असून मशागतीचा खर्च तर बाजूलाच गाडी भाडे फिटने देखील दुरापास्त झाले आहे.
अवकाळी पावसाने अॅपल बोरांच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या अवकाळी पावसाने एक एकरातील अॅपल बोरांच्या झाडांच्या फुलकळ्याच गळून पडल्याने बोरांच्या उत्पादनात घट झाली असल्याने मागील वर्षीच्या तुलनेने यंदा निम्म्याहून अधिक बोरांचे उत्पादन घटले असून भाव देखील कमी मिळत असल्याने खर्च फिटने देखील आवाक्या बाहेर झाले आहे.
- भिवाजी गोडगे,
अॅपल बोर उत्पादक शेतकरी.