उमराणेत लाल कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 06:58 PM2021-02-24T18:58:28+5:302021-02-24T18:58:49+5:30

उमराणे : येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू आठवड्यात सोमवारी (दि.२२) निघालेल्या लाल कांदा दराच्या तुलनेत बुधवारी ( दि.२४ ) तब्बल पाचशे रुपयांची घसरण झाली असून लाल कांद्यास सर्वोच्च ३७०० बाजारभाव मिळाला आहे.

Reduction in red onion prices in Umran | उमराणेत लाल कांदा दरात घसरण

उमराणेत लाल कांदा दरात घसरण

Next
ठळक मुद्दे३७०० रुपये दर : मागणी घटल्याचा परिणाम

उमराणे : येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू आठवड्यात सोमवारी (दि.२२) निघालेल्या लाल कांदा दराच्या तुलनेत बुधवारी ( दि.२४ ) तब्बल पाचशे रुपयांची घसरण झाली असून लाल कांद्यास सर्वोच्च ३७०० बाजारभाव मिळाला आहे.

गेल्या आठवड्यात येथील बाजार समितीत लाल कांद्याची आवक घटल्याने व इतरत्र मागणी वाढल्याने कांद्यांचे बाजारभाव ४२०५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. तेच बाजारभाव चालू आठवड्यात सोमवारीही तसेच होते. सद्यस्थितीत आवक घटत चालल्याने लाल काद्यांचे बाजारभाव टिकून राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच मंगळवारी (दि.२३) दोनशे रुपयांनी तर बुधवारी पुन्हा तीनशे रुपयांची घसरण होत लाल कांद्यांचे बाजारभाव ३७०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. बाजारआवारात पाचशे ट्रॅक्टर व पिकअप वाहनांमधून सुमारे सात ते आठ हजार क्विंटल कांद्याची आवक झाल्याचा अंदाज असून बाजारभाव कमीत- कमी १२०० रुपये, जास्तीत जास्त ३७०० रुपये तर सरासरी ३२०० रुपयांपर्यंत होते.

कांदा उत्पादकांत भीती
येत्या महिनाभर लाल कांद्यांची आवक टिकण्याचा अंदाज असून त्यानंतर लगेचच नवीन उन्हाळी (गावठी) कांदा बाजारात येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे बाजारभाव अजून कमी होतील की काय याबाबत कांदा उत्पादकांत भीती निर्माण झाली आहे.

येथील कांद्यास मागणी असलेल्या गुजरातमधील भावनगर व महुआ तसेच बंगालमधील सुखसागर आदी ठिकाणी स्थानिक कांदा आवक येण्यास सुरुवात झाली असून स्थानिक कांदा दराच्या तुलनेत तेथील कांदा कमी दरात उपलब्ध होऊ लागला आहे. परिणामी त्या राज्यांत मागणी घटल्याने कांदा दरात घसरण झाली आहे.
- संजय देवरे, कांदा व्यापारी, उमराणे

Web Title: Reduction in red onion prices in Umran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.