संदर्भ रु ग्णालयात दक्षता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 09:31 PM2020-06-11T21:31:43+5:302020-06-12T00:32:36+5:30
नाशिक : शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असून, उपनगरांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरात सर्वत्र मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर होताना दिसत आहे.
नाशिक : शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असून, उपनगरांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरात सर्वत्र मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच संदर्भ सेवा रु ग्णालयातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती.
रु ग्णालय परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. वशिष्ठ नामपल्ली यांनी रु ग्णालयात येणाºया प्रत्येकाची थर्मल स्कॅनिंग, रु ग्ण व कर्मचारी यांना मास्कचा वापर अनिवार्य, सॅनिटायझिंग आदी बंधनकारक केले आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांनीदेखील रुग्णालयात येताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.