संदर्भ रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांकडून उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:54 AM2018-11-21T00:54:31+5:302018-11-21T00:54:46+5:30

गैरसोय, अनागोंदी व गोंधळी कारभाराने गाजणाºया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात किडनीवर उपचार घेण्यासाठी दाखल असलेल्या रुग्णावर चक्क सफाई कर्मचाºयांकरवी उपचार करण्यात आल्यामुळे रुग्णाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली असून, या संदर्भात रुग्णाच्या मुलाने तक्रार करूनही प्रकरण रफादफा करण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापन धावपळ करीत आहे.

Reference treatment from cleaning staff in the hospital | संदर्भ रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांकडून उपचार

संदर्भ रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांकडून उपचार

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णाचा मृत्यू : रूग्णालय प्रशासनाकडून प्रकरण दडपल्याची तक्रार, कारवाईची मागणी

नाशिक : गैरसोय, अनागोंदी व गोंधळी कारभाराने गाजणाºया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात किडनीवर उपचार घेण्यासाठी दाखल असलेल्या रुग्णावर चक्क सफाई कर्मचाºयांकरवी उपचार करण्यात आल्यामुळे रुग्णाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली असून, या संदर्भात रुग्णाच्या मुलाने तक्रार करूनही प्रकरण रफादफा करण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापन धावपळ करीत आहे. तीन महिने उलटूनही या साºया प्रकरणाचे सत्य अद्यापही बाहेर आलेले नाही, उलट सफाई कर्मचाºयांना नोटिसा पाठवून म्हणणे मागविण्याचा वेळकाढूपणा केला जात आहे.
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या संदर्भ सेवा रुग्णालयाचा कारभार सध्या रामभरोसे असाच असून, दरदिवशी या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाबाबतच्या तक्रारी होवू लागल्या आहेत. येथील वैद्यकीय अधीक्षकाच्या मनमानी कारभाराला रुग्णालयातील अन्य अधिकारी व परिचारिकाही वैतागल्या आहेत. त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातून येणाºया गोरगरीब रुग्णांवर होवू लागला आहे. वैद्यकीय अधीक्षक एकीकडे व कर्मचारी दुसरीकडे असे चित्र असल्यामुळे रुग्णालयाचे व्यवस्थापन विस्कळीत झाल्याने ठेकेदारी पद्धतीने रुग्णालयाचे कामकाज करून घेतले जात आहे.
शहरातील वडाळानाका येथे राहणारे नारायण रामचंद्र लासुरे यांना किडनीवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधीक्षकाऐवजी चक्क रुग्णालयात ठेकेदारीवर नेमलेल्या सफाई कर्मचाºयांकरवी लासुरे यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना इंजेक्शन देण्यापासून ते सलाइन लावणे, किडणी संदर्भातील चाचण्यादेखील या कर्मचाºयांकरवी केल्या जात असताना लासुरे यांचे पुत्र चंद्रकांत यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. दुर्दैवाने नारायण लासुरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस वैद्यकीय अधीक्षक व उपचार करणारे सफाई कर्मचारी असल्याची तक्रार करून या संदर्भात चौकशी करण्याची मागणी चंद्रकांत लासुरे यांनी केली आहे.
व्यवस्थापनाचा मनमानी कारभार
आॅगस्ट महिन्यात घडलेल्या या घटनेला तीन महिन्यांचा कालावधी लोटला असून, संदर्भ सेवा रुग्णालयच्या व्यवस्थापनाकडून प्रकरण दडपण्याचे प्रयत्न केले जात आहे. या संदर्भात महाराष्टÑ शासन, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सकांकडे दाद मागण्यात आली असून, तक्रारदाराने चालविलेल्या पाठपुरावा पाहून वैद्यकीय अधीक्षकांनी सफाई काम करणाºया ठेकेदाराला नोटीस बजावून त्याचे म्हणणे मागविले आहे. या साºया गोष्टीसाठी प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप लासुरे यांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णालयावरच शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली असून, व्यवस्थापनाचा मनमानी कारभारामुळे तेथील कर्मचाºयांची मानसिकताही बिघडल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Reference treatment from cleaning staff in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.