आरोग्य उपसंचालकांची  संदर्भ सेवेला अचानक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:27 AM2018-11-25T00:27:47+5:302018-11-25T00:28:14+5:30

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात मंजूर नसलेली पदे भरून सरकारची फसवणूक करण्याच्या प्रकाराबद्दल ‘लोकमत’मध्ये वृत्त येताच, त्याची दखल घेत आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधीक्षकासह अन्य अधिकाऱ्यांना जाब विचारला.

Referring to the Health Deputy Director, a sudden visit to the service | आरोग्य उपसंचालकांची  संदर्भ सेवेला अचानक भेट

आरोग्य उपसंचालकांची  संदर्भ सेवेला अचानक भेट

Next

नाशिक : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात मंजूर नसलेली पदे भरून सरकारची फसवणूक करण्याच्या प्रकाराबद्दल ‘लोकमत’मध्ये वृत्त येताच, त्याची दखल घेत आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधीक्षकासह अन्य अधिकाऱ्यांना जाब विचारला. रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबद्दल अवगत असलेल्या रावखंडे यांनी जी पदे मंजूर नाहीत व रुग्णालयात रुग्णांवर उपचाराची साधने नाहीत, अशा ठिकाणी डॉक्टरांची नेमणूक करण्यामागच्या षडयंत्राचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना समाधानकारक उत्तर न देता वैद्यकीय अधीक्षकांनी सारवासारव केल्याचे सांगण्यात आले.
सकाळी ११ वाजता उपसंचालक डॉ. रावखंडे यांनी संदर्भ रुग्णालयास भेट देऊन अगोदर पाहणी केली तसेच तत्काळ अधिकाºयांची बैठक बोलावून दररोज वृत्तपत्रात येत असलेल्या नवनवीन गोंधळ व अनागोंदीच्या वृत्ताबाबत विचारणा करून धारेवर धरले. अस्थिरोग, स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची पदे मंजूर नसताना भरण्याची कारणे काय याबाबत जाब विचारला. एवढेच नव्हे तर राज्य सरकारने विचारणा केल्यास काय उत्तर देणार, असा सवालही केला. त्यावर रुग्णालयाची गरज म्हणून सदरची पदे भरल्याचे शासनाला कळविण्याचे ठरविण्यात आले. कॅन्सरवर उपचार करणाºया रेडिओथेरेपी यंत्रणा बंद असल्याबाबतही यावेळी चर्चा झाली. त्यावर यंत्र सुरू असल्याचे भासविण्यात आले.  रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबद्दल शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दुपारी रुग्णालयात जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. बंद पडलेली यंत्रसामग्री, रुग्णांशी केली जाणारी अरेरावी, स्वच्छता कर्मचाºयांकडून होणारे उपचार अशा बाबींचा ऊहापोह करून व्यवस्थापनाला धारेवर धरण्यात आले. पदे मंजूर नसलेल्या डॉक्टरांना त्वरित सेवामुक्ती द्या, अशी मागणी करून येत्या दहा दिवसांत कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका किरण दराडे, दीपक दातीर आदींनी दिला.
देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून सदरची यंत्रणा खरेदी केली असून, तिच्या देखभाल दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे कॅन्सर पीडितांवर उपचार करण्यात अपयश येत असतानाही रुग्णालय व्यवस्थापनाने उपसंचालकांना दिशाभूल करणारी माहिती सादर केली. विशेष म्हणजे रुग्णालयाला नको असलेली पदे भरण्यात रस दाखविणाºया रुग्णालयाने कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यासाठी मेडिकल अंकोलिस्ट हे पदच भरलेले नाही. त्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांवर योग्य ते उपचार होत नसल्याचेही समोर आले .

Web Title: Referring to the Health Deputy Director, a sudden visit to the service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.